Xiaomi कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन Mi 11 Ultra लवकरच भारतात लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला होता. मात्र आता हा स्मार्टफोन येत्या 23 एप्रिलला भारतात लाँच होणार आहे. कंपनीने अधिकृत ट्विटर पेजवर (Xiaomi Official Twitter Page) याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरवर शाओमीने Mi 11 Ultra ची भारतातील लाँच डेटची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन ड्युल डिस्प्ले (Dual Display), 12GB पर्यंत रॅम आणि 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.81 इंचाची 120Hz 2K AMOLED डिस्प्ले मिळते. फोनच्या डिस्प्लेमध्ये HDR10+Dolby Vision सपोर्ट दिला आहे. यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस कोटिंग दिली गेली आहे. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे.हेदेखील वाचा- Airtel च्या प्रीपेड युजर्संना धक्का! 100 रुपयांखालील 'हा' रिचार्ज प्लॅन बंद
All-Mighty Camera setup 📷
All-Mighty Performance ✌
All-Mighty Displays 📱
All-Mighty Build 😍
All-Mighty Power 💪
on The Only #SuperPhone - https://t.co/nZvuM8atx1
Unveiling on 23.04.2021.#Mi11Ultra pic.twitter.com/CV0aPITCU8
— Mi India (@XiaomiIndia) April 1, 2021
Xiaomi Mi 11 Ultra च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. त्याशिवाय 48MP चा टेलिफोटो, 48MP चा वाइड अँगल आणि 20MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये टेलिफोटो कॅमे-यामध्ये 120x पर्यंत डिजिटल जूम फोटो क्लिक करता येऊ शकते.
हा स्मार्टफोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसुद्धा येतो. चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत RMB 5,999 (जवळपास 67,700रुपये) ही सुरुवाती किंमत आहे. यात 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.