Airtel (Photo Credits: File Image)

एअरटेलच्या (Airtel) प्रीपेड युजर्ससाठी (Prepaid Users) धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंपनीने आपला 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. दरम्यान, एअरटेलचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन केवळ काही ठराविक भागातच उपलब्ध होता. सुरुवातीला मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात असणारा हा प्लॅन बिहार, झारखंड, ओडिसा या राज्यांमध्येही सुरु करण्यात आला होता. मात्र आता हा प्लॅन बंद झाल्याने एअरटेल एन्ट्री लेव्हल युजर्स 19 रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन आणि 129 रुपायांचा एन्ट्री लेव्हल रिचार्ज प्लॅन घेऊ शकतात.

काय होता एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन?

एअरटेलच्या 99 रुपायंच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 18 दिवसांची होती. यात 1 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर लोकल/इंटरनॅशनल अनलिमिडेट कॉल्स मिळत होते. त्याचबरोबर Airtel Xstream, Wynk Music आणि Zee5 Premium चे फ्री सब्सक्रीप्शन देखील देण्यात येत होते. (Jio ने लाँच केला धमाकेदार प्लान; ग्राहकांना देण्यात येणार एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सेवा, जाणून घ्या सविस्तर)

129 रुपयांचा प्रीपेड प्लॅन काय आहे?

एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा, दर दिवशी 300 एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग मिळत आहे. त्याचबरोबर Airtel Xstream, Wynk Music आणि Zee5 Premium चे फ्री सब्सक्रीप्शन देखील मिळत आहे.

दरम्यान, हाय रेव्हेन्यू कस्टमर्स आणि भारतीय ग्राहकांची संख्या वाढल्याने भारती एअरटेलने डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत 854 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. परंतु,  गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,035.3 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.