Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 19 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता
Infinix Hot 10 Play Smartphone (Photo Credits: Infinix)

हॉंगकॉंग मधील इन्फिनिक्स (Infinix) स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून इन्फिनिक्स हॉट 10 प्ले (Infinix Hot 10 Play) मोबाईल भारतामध्ये 19 एप्रिल 2021 रोजी लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली आहे. एका प्रेसनोट द्वारे कंपनीकडून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतील उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या शेड्समध्ये उपलब्ध असेल- Morandi Green, 7-degree Purple, Aegean Blue आणि Obsidian Black. हा मोबाईल सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे.

इन्फिनिक्स हॉट 10 प्ले मध्ये 6.82 इंचाचा एचडी+आयपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला असू शकतो. या मोबाईलमध्ये MediaTek Helio G25 SoC प्रोसेसर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोबाईलमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 इंटरनल स्टोरेज असू शकतो. त्यासोबतच 512GB पर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड तुम्ही यात वापरु शकता.

Infinix India Tweet:

या मोबाईलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला असून यात 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Hot 10 Play Smartphone (Photo Credits: Infinix)

या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि 10W चा चार्गिंग सपोर्ट देण्यात आला असेल. हा फोन Android 10 वर आधारित XOS 7.02 या ऑपरेटिंग स्टिटमवर काम करत असावा, असा अंदाज आहे. या फोनची किंमत आणि इतर फिचर्सची माहिती लॉन्च इव्हेंटच्या वेळी कंपनीकडून देण्यात येईल.