देशात प्रथमच विक्रम-एस या खासगी अंतराळ कंपनीने बनवलेले रॉकेट यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. आज म्हणजेच 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशाच्या जगात नवा इतिहास रचला गेला. हैदराबादस्थित खाजगी अंतराळ कंपनी स्कायरूट एरोस्पेसचे (Skyroot Aerospace) रॉकेट विक्रम-एस (Vikram-S) ने अवकाशात उड्डाण केले. रॉकेट आवाजाच्या पाचपट वेगाने अंतराळात गेले. म्हणजे हायपरसोनिक वेगाने. या प्रक्षेपणाने भारतीय अवकाश कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याची भावना या प्रक्षेपणानंत व्यक्त होऊ लागली आहे.
विक्रम-एस रॉकेट बनवणारी स्कायरूट ही केवळ चार वर्षे जुनी कंपनी आहे. या कंपनीचे रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने प्रक्षेपित केले आहे. या मोहिमेला मिशन प्ररंभ असे नाव देण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान सांगितले की, हे उड्डाण केवळ एक चाचणी उड्डाण आहे. इस्रोने आपल्या उड्डाणासाठी प्रक्षेपण विंडो निश्चित केली होती. (हेही वाच, NASA’s Artemis 1 Launch: नासाकडून ऐतिहासिक चंद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण)
ट्विट
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC-SHAR) येथून विक्रम-एस प्ररंभ स्कायरूट मिशनचे प्रक्षेपण pic.twitter.com/76v2D2MEJ4
— प्रसार भारती न्यूज सर्विस अँड डिजिटल प्लॅटफॉर्म (@PBNS_Marathi) November 18, 2022
दरम्यान, या रॉकेटला प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी काही वेळापूर्वीच स्कायरूट कंपनीच्या मिशन स्टेटमेंटचे अनावरण केले. या रॉकेटवर दोन देशी आणि एक विदेशी पेलोडही जात आहेत. सहा मीटर उंचीचे हे रॉकेट जगातील पहिले सर्व ऑल कंपोजिट रॉकेट (All Composite Rocket) आहे. यात 3D-प्रीटेंडेड सॉलिड थ्रस्टर्स आहेत.