Chandrayaan 2 (Photo Credits: ISRO)

भारताची दुसरी चांद्रमोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जुलैला अवकाशात झेपावलेल्या चांद्रयान 2 ने आज या मोहिमेतील अजून एक मोठा टप्पा पार केला आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, आज (2 सप्टेंबर) दुपारी दीडच्या सुमारास चांद्रयान 2 चे लॅन्डर विक्रम ऑर्बिटरपासून वेगळे झाले आहे. आता पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजेच 7 सप्टेंबरला चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार आहे. विक्रम लॅन्डर ऑर्बिटरपासून वेगळा होणं हे या मोहिमेतील एका कठीण टप्प्यांपैकी एक होते. मात्र आता तो देखील टप्पा पूर्ण झाल्याने इस्त्रोच्या संशोधकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 2 ने पाठवलेला चंद्राचा पहिला फोटो इस्त्रोने शेअर केला होता.

चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर होते. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III)या प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. Chandrayaan 2 Launch: ISRO च्या दुसऱ्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेची 10 खास वैशिष्ट्यं

इस्त्रोचं ट्वीट 

चांद्रयान 2 हे 22 जुलै दिवशी श्रीहरिकोटा येथून अवकाशामध्ये झेपावले. त्यानंतर एक एक टप्पा पूर्ण करत आता अखेर अंतिम टप्प्यात पोहचले आहे. आज एक मह्त्त्वाचा टप्पा चांद्रयान 2 ने पार केल्यानंतर सामान्यांसह अनेक दिग्गजांनी इस्त्रोचं कौतुक केलं आहे.