Chandrayaan 2 Launch: ISRO च्या दुसऱ्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेची 10 खास वैशिष्ट्यं
Image used for representational purpose | (Photo Credits: Twitter/@ISRO)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ची बहुचर्चित Chandrayaan 2 मोहीम आता अवघ्या काहीच क्षणांवर येऊन ठेपली आहे. यापूर्वी 15 जुलैला या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती, त्यानुसार, आज म्हणजे २२ जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मधील श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून GSLV-Mk III प्रक्षेपकाद्वारा चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावणार आहे. चंद्रयान 1 च्या यशनानंतर तब्बल 10 वर्षांनी अशा प्रकारची धाडसी मोहीम आखण्यात आली असल्याने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडून लागून आहे. जर का, ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्रावर 'Soft Landing' करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

चंद्रयान 2 ही मोहीम भारताच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक मोहीम असणार आहे, मात्र ISRO तर्फे बनवण्यात आलेलं हे चंद्रयान (GSLV Mk III) प्रक्षेपकामार्फत अंतराळात सोडण्यात येणार आहे त्यानंतर साधारणदोन महिन्यांनी हे यान चंद्रावर पोहचेल. या संपूर्ण चंद्रयानचे वजन हे 3.8 टन असणार आहे तर पूर्ण मोहिमेसाठी 987 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.चला तर मग, याच निमित्ताने चंद्रयान 2 या महत्वकांक्षी मोहिमेबद्दल 10 खास गोष्टी जाणून घेऊयात..

  1. चंद्रयान 2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर Soft Landing करू इच्छिणारे पहिले अंतराळयान असणार आहे.
  2. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले चंद्राच्या कक्षेत जाणारे अंतराळयान धाडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
  3. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत हा US ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.
  4. चंद्रयानाचे लँडर चंद्रावर उतरताच पहिल्या 15 मिनिटात तेथील पहिली झलक पाहता येईल असा विश्वास आहे, मात्र चंद्रावर लँडर उतरल्यापासून त्यातील रोव्हर बाहेर येण्यासाठी चार तासांचा अवधी लागणार आहे.
  5. या चंद्रयानात विविध प्रयोगांसाठी लागणारी 13 वैज्ञानिक उपकरणे असणार आहेत, चंद्रावरील खडकांचे फोटो घेऊन नंतर त्यात कॅल्शियम, मँग्नेशियम व लोह यांसारख्या धातूंचा अंश तपासला जाईल.
  6. ISRO च्या माहितीनुसार हे यान चंद्रावर, पाणी आणि अन्य खनिजांचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल.
  7. चंद्रयान 2 मध्ये तीन भाग असतील, ज्यात विक्रम हे लँडर, प्रग्यान हे रोव्हर तर एका orbiterचा समावेश आहे
  8. या ऑरिबेटरचा कार्यकाळ हा एका वर्षाचा असून, लँडर आणि रोव्हरची क्षमता चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वी वरील एका दिवसाएवढी आहे.
  9. या मोहिमेत नियोजित केलेले वैज्ञानिक प्रयोग हे रोव्हरच्या माध्यमातून करण्यात येतील, हे रोव्हर चंद्रावर उतरल्याचे ठिकाणापासून 500 मीटरच्या अंतरामध्ये फिरू शकणार आहे.
  10. रोव्हरच्या एका चाकावर भारताची ओळख असलेले अशोक चक्र असेल तर लँडर वर तिरंगा असणार आहे.

चंद्रयान 2 या चंद्रमोहिमेसाठी मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रोचे संशोधक काम करत आहे. अखेर उड्डाणासाठी सज्ज झालेले हे यान 21 जुलैच्या दुपारी 2.43 मिनिटांनी उड्डाण घेणार आहे. या लॉन्चिंगचं लाईव्ह प्रक्षेपण इस्त्रोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं जाणार आहे. त्यामुळे इस्त्रोच्या Facebook आणि @isro या Twitter अकाऊंटवर पाहता येणार आहे.