Chandrayaan-2 Launch Live News Updates: चांद्रयान-2 ची अवकाशात यशस्वी झेप, इस्रोमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात
टेक्नॉलॉजी
टीम लेटेस्टली
|
Jul 22, 2019 04:03 PM IST
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (Indian Space Research Organisation) च्या बहुचर्चित चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या मोहिमेचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. तर आज दुपारी 2.43 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून भारताचे चंद्रयान अवकाशात सोडण्यात येणार आहे. तर तब्बल 10 वर्षानंतर दुसऱ्या चंद्रयानची मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. त्याचसोबत चंद्रयान 2 ची मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर 'Soft Landing' करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरु शकणार आहे.
चांद्रयान-2 ची मोहिम 15 जुलै रोजी पार पडणार होती. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे चंद्रयान अवकाशात उड्डाण घेण्याच्या एकातासापूर्वी ते रद्द करण्यात आले. परंतु आज (22 जुलै) रोजी चांद्रयान-2 ची मोहिम पार पडणार असून याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच चंद्रयानाचे लँडर चंद्रावर उतरताच पहिल्या 15 मिनिटात तेथील पहिली झलक पाहता येईल असा विश्वास आहे, मात्र चंद्रावर लँडर उतरल्यापासून त्यातील रोव्हर बाहेर येण्यासाठी चार तासांचा अवधी लागणार आहे. या चांद्रयानात विविध प्रयोगांसाठी लागणारी 13 वैज्ञानिक उपकरणे असणार आहेत. चंद्रावरील खडकांचे फोटो घेऊन नंतर त्यात कॅल्शियम, मँग्नेशियम व लोह यांसारख्या धातूंचा अंश तपासला जाईल.(Chandrayaan 2 Launch Live Streaming: ऑनलाईन आणि टेलिव्हिजन वर कधी आणि कुठे पहाल ISRO च्या चंद्रमोहिमेचं लाईव्ह लॉन्चिग)
1- ऑर्बिटर
वजन- 3500 किलो
लांबी- 2.5 मीटर
2- लॅंडर
नाव - विक्रम
वजन- 1400 किलो
लांबी- 3.5 मीटर
3- रोवर
नाव- प्रज्ञान
वजन- 27 किलो
लांबी- 1 मीटर
चंद्राच्या दक्षिण धुव्राच्या आसपासच्या भागावर अद्याप कोणतेच संशोधन करण्यात आलेले नाही. त्यामुळे चंद्रयान 2 लॉन्च झाल्यानंतर यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर लॅंडर आणि ऑर्बिटर वेगळे होतील.