Chandrayaan 2 (Photo Credits: ISRO)

भारताची चंद्रमोहिम चांद्रयान 2 (Chandrayaan 2) चं  प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर आता आज (22 जुलै) च्या दुपारी पुन्हा या ऐतिहासिक कामगिरीसाठी इस्त्रोचे (ISRO)  संशोधक सज्ज झाले आहेत. भारताच्या दृष्टीने महत्त्वांकांक्षी असलेल्या या मोहिमेसाठी अनेक भारतीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच प्रार्थना देखील सुरू झाल्या आहे. आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी GSLV-Mk III प्रक्षेपकाद्वारा चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावणार आहे. काही उत्सुक खगोलप्रेमींनी या मोहिमेची तयारी आणि प्रक्षेपण लाईव्ह पाहण्यासाठी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर आपली जागा पक्की केली आहे. परंतू ज्यांना हे प्रक्षेपण थेट चैन्नईतून पाहण्यासाठी तिकीटं मिळाली नाही त्यांना आता डिजिटल मीडियामातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारा लाईव्ह पाहता येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच टेलिव्हिजनवरही हे प्रक्षेपण पाहता येणार आहे. दूरदर्शन वरही हे लाईव्ह लॉन्चिंग पाहता येणार आहे.  ISRO ची महत्वाकांक्षी चंद्रमोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी

कुठे पहाल चंद्रयान 2 चं लॉन्चिंग

चंद्रयान 2 या चंद्रमोहिमेसाठी मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रोचे संशोधक काम करत आहे. अखेर उड्डाणासाठी सज्ज झालेले हे यान 22जुलैच्या दुपारी 2.43 मिनिटांनी उड्डाण घेणार आहे. या लॉन्चिंगचं लाईव्ह प्रक्षेपण इस्त्रोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं जाणार आहे. त्यामुळे इस्त्रोच्या Facebook आणि @isro या Twitter अकाऊंटवर पाहता येणार आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मप्रमाणेच टीव्हीवर देखील चंद्रयान 2 चं प्रक्षेपण पाहता येणार आहे. दूरदर्शनवर 2.10 पासून इस्त्रोच्या मिशन कंट्रोल रूममधून लाईव्ह दाखवले जाणार आहे.

चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. रविवार (21जुलै) च्या संध्याकाळी 6.43 मिनिटांनी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाला 'बाहुबली' असं देखील संबोधलं जातं. याची किंमत सुमारे 375 कोटी असून चांद्रयान 2 साठी 603 कोटी खर्च केला आहे.