Chandrayaan 2 Sents Image Of Moon: चांद्रयान 2 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो; जरा निरखूनच पाहा
Chandrayaan 2 Sents Image Of Moon | (Photo Credit: ISROI/Twitter)

Chandrayaan 2 Sents Image Of Moon:  चांद्रयान 2 ने चंद्राचा टीपलेला पहिला फोटो पाठवला आहे. जो भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थातच इस्रोने ट्विटरवरुन शेअरही केला आहे. हा फोटो चंद्रापासून तब्बल 2650 किमी इतक्या अंतरावरुन काढला आहे. पृथ्वीवरुन पाहताना टोपलीतील भाकरीयेवढा दिसणारा हा चंद्र किती आकर्षक, सुंदर आणि तितकाच गूढ आहे, याची प्रचिती हा फोटो पाहिल्यावर येते.

अत्यंत अवघड असा मानला जाणारा टप्पा चांद्रयान 2 ने २१ ऑगस्ट रोजी पार केला. हा टप्पा पार करताच चांद्रयान 2 ने चंद्राच्य कक्षेत प्रवेश केला. चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया काल (बुधवार, 21 ऑगस्ट 2019) सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी पूर्ण झाली. 14 ऑगस्ट 2019 रोजी चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेने झेपावले. हे यान झेपावण्यापूर्वी चांद्रयान 2 मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र, हे सर्व अडथळे दूर करत चांद्रयान 2 चंद्राकडे झेपावले. (हेही वाचा, Chandrayaan 2 ने धाडलेली पृथ्वीची झलक ISRO ने केली शेअर, तुम्ही पाहिलंत का? (See Photos))

इस्त्रो ट्विट

एएनआय ट्विट

चांद्रयान 2 ही भारताच्या चांद्र मोहिमेचा दुसरा टप्पा आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेन. चांद्रायन 2 च्या माध्यमातून चंद्र या उपग्रहाबाबत असलेल्या अनेक रहस्यांचा उलघडा होणार आहे. भारताने चांद्रयान 1 ही चंद्रावर पाठवले होते. या वेळी चांद्रयान 1 ला चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. आता चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो पाठवला. त्यामुळे आता यापुढे हे यान चंद्राचे कोणते पैलू उलघडणार याबाबत उत्सुकता आहे.