काल (24 ऑक्टोबर) दिवाळीची पहिली आंघोळ झाल्यानंतर आज (26 ऑक्टोबर) भारतामध्ये सूर्यग्रहण आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून सूर्यग्रहणाची (Surya Grahan) स्थिती निर्माण होते. अवकाशात घडणार्या अनेक रंजक घटनांपैकी सूर्यग्रहण ही एक घटना आहे. त्यामुळे हे ग्रहण पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तुम्ही सुद्धा उत्सुक असाल तर थेट डोळ्यांनी सूर्य पाहू नका. थोडी काळजी आणि योग्य उपकरणांच्या मदतीने हे सूर्यग्रहण पाहिल्यास त्याचा कोणताच त्रास तुम्हांला होणार नाही.
सूर्यग्रहणामध्ये अगदी थोड्या वेळासाठी देखील थेट डोळ्यांनी सूर्याकडे पाहणं धोकादायक आहे. तुमच्या डोळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. अंधत्त्व येण्याचा धोका संभवतो. त्यामुळे याबाबतची सावधानता नक्की पाळा. हे देखील नक्की वाचा: Surya Grahan 2022 Live Streaming: सूर्य ग्रहण सुरक्षितपणे अनुभवण्यासाठी इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video).
सूर्यग्रहण पाहताना कशी काळजी घ्याल?
- तुम्हांला थेट सूर्यग्रहण पहायचं असेल तर ते केवळ eclipse glasses घालून पहावं. साध्या सनग्लासेस घालून सूर्यग्रहण पाहणं धोकादायक आहे.
- eclipse filters च्या माध्यमातूनही तुम्ही सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहू शकता.
- सूर्यग्रहणाच्या वेळेत सूर्याकडे मूळीच थेट डोळ्यांनी पाहू नका. त्याचा त्रास होऊ शकतो.
- Pinhole projection द्वाराही तुम्ही सूर्यग्रहण पाहू शकता. कार्डबोर्डच्या तुकड्यावर फक्त एक छिद्र करा जे सूर्याकडे तोंड करून कागदाच्या तुकड्यावर सूर्याची प्रतिमा प्रक्षेपित करेल आणि त्याच्या सावलीत तीन किंवा चार फूट मागे दुसरे कार्ड धरून ठेवा.
(नक्की वाचा: Surya Grahan 2022 Sutak Timings: 25 ऑक्टोबरच्या सूर्यग्रहणात सुतक काळ पहा किती वेळ पाळायचा? )
भारतात, ग्रहण दुपारी सूर्यास्तापूर्वी सुरू होईल आणि देशात बहुतेक प्रांतात दिसणार आहे. अहवालानुसार, ही खगोलीय घटना 1 तास 45 मिनिटे पाहता येणार आहे. भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात ग्रहण पाहता येणार आहे. दरम्यान, पोरबंदर, गांधीनगर, मुंबई, सिल्वासा, सुरत आणि पणजी यांसारख्या अत्यंत पश्चिमेकडील शहरांमध्ये ग्रहण एका तासापेक्षा जास्त वेळ पाहता येईल.