Surya Grahan 2020 Maharashtra Sutak Timing: सूर्यग्रहणाचे आज रात्री पासून सुरू होणार वेध; जाणून घ्या सुतक काळात कोणत्या गोष्टी टाळतात?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये 21 जून दिवशी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) 21 जून दिवशी दिसणार आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी हे कंकणाकृती (Annular Solar Eclipse) दिसेल तर महाराष्ट्रात रविवारी दिसणारं सूर्यग्रहण हे खंडग्रास असेल. दरम्यान भारतीय संस्कृतीमध्ये ग्रहण ही एक खगोलीय आणि नैसर्गिक घटना असली तरीही त्याच्या बाबात जनसामान्य काही नियम पाळतात. त्यापैकी एक म्हणजे सुतक काळ. हिंदू धर्मीय ग्रहणाचे वेध काळ ते मोक्ष काळ या दरम्यान चांगल्या गोष्टी टाळतात. गरोदर महिला, नवजात बालकं यांना विशेष जपलं जाते. दरम्यान हा श्रद्धेचा भाग असून ग्रहणाचा बाळाच्या, गर्भाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. Surya Grahan 2020 Pregnancy Precautions: गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या काळात कोणती काळजी घ्यावी?

सामान्यपणे सूर्य ग्रहणात वेध काळ, सुतक काळ हा ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. त्यामुळे उद्याच्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा सुतक काळ आज (20 जून) रात्री पासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील हे सूर्यग्रहण आणि त्यासंबंधीचे नियम पाळणार असाल तर जाणून या ग्रहणाच्या सुतक काळापासून मोक्ष काळा पर्यंतच्या महत्त्वाच्या वेळा काय? Surya Grahan June 2020 Timing: कंकणाकृती सूर्यग्रहण 21 जून दिवशी; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर्, नाशिक सह भारताच्या विविध शहरात नेमकी किती वाजता पाहता येणार ही खगोलीय घटना!

21 जून सूर्य ग्रहण महत्त्वाच्या वेळा

जोतिर्विद आनंद पिंपळकर यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ग्रहणाचा वेध काळ 20 जून रात्री 10 पासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळावेत. गरोदर स्त्रिया, वृद्ध, आजारी व्यक्ती यांनी 21 जून पहाटे 4.45 पासून वेध पाळावेत.

ग्रहण स्पर्श वेळ - 10: 01

ग्रहण मध्य वेळ- 11: 38

ग्रहण मोक्ष वेळ - 13: 28

दरम्यान ग्रहण स्पर्श ते मोक्ष हा पुण्यकाळ पाळावा. त्यामुळे यंदा 21 जूनचे सूर्यग्रहण हे 3 तास 27 मिनिटांचे असेल.

पारंपारिक रूढी परंपरा आणि मान्यातांनुसार, अशुभ फल असणार्‍या राशी, गर्भवती स्त्रिया यांनी ग्रहण पाहू नये. तर इतरांनीही ग्रहण पाहताना डोळ्यांना इजा पोहचू नये याकरिता विशेष खबरदारी घ्यावी. थेट उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघू नये. सुरक्षित युव्हि ग्लेअर्स, ग्रहण पाहण्याचे विशेष चष्मे यांचा वापर करावा.