अवकाशाचं आकर्षण असाणार्यांसाठी ऑगस्ट महिना पर्वणी घेऊन आला आहे. ऑगस्ट महिन्यात दोन दिवस सूपरमून (Supermoon) चं दर्शन होणार आहे. यामध्ये चंद्र 14% मोठा आणि 30% अधिक प्रकाशमान दिसणार आहे. आज 1 ऑगस्ट दिवशी पहिला तर 30 ऑगस्ट दिवशी याच महिन्यात दुसर्यांदा सूपरमून न्याहाळता येणार आहे. आजचा सूपरमून भारतीयांना देखील पाहता येणार असल्याने चंद्राचं विलोभनीय रूप आज नक्की डोळ्यात सामावून घ्या.
सूपरमून काय असतो?
अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या माहितीनुसार, चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते जिला perigee असंही म्हटलं जातं. त्याच वेळी चंद्र पूर्ण असतो तेव्हा ही सूपरमूनची घटना घडते. आज मंगळवार, 1 ऑगस्ट दिवशी चंद्र पृथ्वीपासून 357,530 किमी दूर असेल. 30 ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून आणखी जवळ येईल म्हणजेच तो 357,244 किमी अंतरावर असणार आहे.
आजची सुपरमून पाहण्याची वेळ
space.com नुसार, 1 ऑगस्टचा सुपरमून रात्री 9:30 EDT च्या आसपास (2 ऑगस्ट रोजी 12.01 वाजता IST) उगवेल आणि तो बुधवारी पहाटे 5:11 EDT (2 ऑगस्ट रोजी 2.41 IST) वाजता मावळेल.
सुपरमून कसा पहाल?
आज सुपरमून पाहण्यासाठी काही विशेष उपकरणांची गरज नाही. साधारण कोणताही अडथळा नसलेल्या क्षितिजावर सूपरमून पाहता येऊ शकतो. प्रदुषण कमी असलेल्या ठिकाणी हा सूपरमून नीट पाहता येऊ शकतो. हा सूपरमून पाहण्यासाठी binoculars किंवा telescope अर्थात दुर्बिण देखील वापरू शकता.
चंद्राच्या आकारमानात फरक दिसून येतो कारण तो पृथ्वीभोवती किंचित लंबवर्तुळाकार 27.3-दिवसांच्या कक्षेत फिरतो, ज्यामुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी थोडा दूर असतो. 2018 मध्ये असा एका महिन्यात दोनदा सूपरमून दिसला होता तर यानंतर 2037 पर्यंत एकाच महिन्यात दोनदा सूपरमून पाहण्याची संधी नाही.