Vallabhbhai Kathiria | (Photo Credits: ANI)

गाईचे शेण (Cow Dung ) त्याचे महत्त्व, औषधी गुणधर्म, त्यावरील आक्षेप यांबाबत अनेकदा चर्चा होते. दरम्यान, राष्ट्रीय कामधेनु आयोग (RKA) अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया (Vallabhbhai Kathiria) यांनी तर एक हटकेच माहिती दिली आहे. कथीरिया यांनी म्हटले आहे की गाईच्या शेणापासून मोबाईलमधून निघणारे रेडिएशन ( Radiation From Mobile Phones) कमी करण्यास मदत होते. कथीरिया यांनी सोमवारी (12 ऑक्टोबर) सांगितले की, त्यांनी एका मोबाईल चिफचे ( Cow Dung 'Chip') उद्घाटनही केले आहे. ही चिफ गायीच्या शेणापासून बनविण्यात आली असून, मोबाीलमधून निघणारे रेडिएशन्स ती कमी करते. ‘कामधेनु दीवाली’ या देशव्यापी अभियानादरम्यान ही माहिती दिली. गाईचे शेण उत्पादन वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वल्लभभाई कथीरिया यांनी पुढे बोलताना सांगितले की, गाईच्या शेणापासून निर्मिती करण्यात आलेली चिफ आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेऊ शकता. जेणेकरुन आपल्या मोबाईलमधून निघणारे रेडिएशन्स आपण बऱ्याच प्रमाणावर कमी करु शकता. जर आपण एखाद्या आजारापासून बचाव करु इच्छित असाल तरीही आपण ही चिफ वापरु शकता. या चिपचे नाव ‘गौसत्त्व कवच’ ठेवण्यात आले आहे. ही चीप राजकोट येथील श्रीजी गौशालाने विकसीत केली आहे.

राष्ट्रीय कामधेनु आयोग अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया सांगतात की, आपण बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे नाव ऐकले असेलच. त्यानेही गाईचे शेण खाल्ले आहे आपणही हे खाऊ शकता. हे एक औषध आहे. आज आपण खरे विज्ञान विसरलो आहोत, असेही कथीरिया म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus on Phone Screens and Banknotes: सावधान! तुमच्या फोन स्क्रीन, पैशांच्या नोटांवर कोरोना विषाणू किती दिवस जिवंत राहु शकतो? तुम्हाला माहितीय? घ्या जाणून)

दरम्यान, अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आपण आयुर्वेदीक कारणास्तव गोमूत्र प्रशन करतो. कथीरिया यांनी अक्षय कुमार याच्या या विधानाचा आधार घेत वरील वक्तव्य केले. आम्ही एक नवा उपक्रम तयार केला असून त्यावर संशोधन सुरु असल्याचेही कथारीया यांनी सांगितले.

द इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना कथीरिया यांनी सांगितले की, देशभरातील 500 पे७ा अधिक गोशाळांमधून एंडी रेडिएशन चिप बनत आहेत. या चिप 50-100 रुपयांना खरेदी केल्या जाऊ शकतात. एका व्यक्तीने या चिप अमेरिकेतही निर्यात केल्या आहेत. त्या प्रती चिप 10 डॉलर इतक्या रकमेला विकल्या जात आहेत.