अंतराळ संशोधनातील प्रगतीसोबतच, अलीकडेच अशा तंत्रज्ञानावरही बराच वेळ आणि पैसा गुंतवला आहे ज्यामुळे अवकाश संसाधनांचा प्रभावी वापर शक्य होईल. या सर्व प्रयत्नांमध्ये, चंद्रावर ऑक्सिजन (Moon Oxygen) तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. गेले अनेक वर्षे चंद्रावर मानवी वस्ती कशी राहू शकेल यावर संशोधन सुरु आहे. आता चंद्राच्या वरच्या पृष्ठभागावर पुरेसा ऑक्सिजन असल्याचे आढळले आहे, जे 8 अब्ज लोकांना एक दशलक्ष वर्षे जिवंत ठेवू शकते. अशा परिस्थितीत हा ऑक्सिजन मानवांसाठी श्वास घेण्यायोग्य कसा बनवता येईल, याकडे आता अभ्यासाचे लक्ष आहे.
ऑक्टोबरमध्ये, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी आणि NASA ने आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत चंद्रावर ऑस्ट्रेलियन-निर्मित रोव्हर पाठवण्याच्या करारावर स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश चंद्रावर श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजन प्रदान करू शकणारे चंद्र खडक गोळा करणे आहे. चंद्राचे वातावरण अतिशय पातळ आहे आणि त्यात मुख्यतः हायड्रोजन, निऑन आणि आर्गॉन वायू असतात. त्यात मानव आणि सस्तन प्राण्यांसाठी आवश्यक ऑक्सिजनचे मिश्रण नसते.
प्रत्यक्षात चंद्रावर भरपूर ऑक्सिजन आहे. ते फक्त वायू स्वरूपातच नाही तर, ते चंद्राला झाकणाऱ्या खडकाच्या थरात आणि रेगोलिथ नावाच्या बारीक धूळातही आहे. जर आपण अशा थरातून ऑक्सिजन काढू शकलो तर चंद्रावरील मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी ते पुरेसे असेल का? याबाबत रिसर्च चालू होता. (हेही वाचा: यंदाच्या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला; पहा सर्वात मोठ्या कालावधी साठी होणार्या या ग्रहणाचा वेळ काय? कुठे पहाल?)
चंद्राचा रेगोलिथ सुमारे 45 टक्के ऑक्सिजनने बनलेला आहे. चंद्र रेगोलिथच्या प्रत्येक क्यूबिक मीटरमध्ये सुमारे 630 किलोग्रॅम ऑक्सिजनसह सरासरी 1.4 टन खनिजे असतात. नासाचे म्हणणे आहे की मानवाला जगण्यासाठी दररोज सुमारे 800 ग्रॅम ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे 630 किलो ऑक्सिजन माणसाला सुमारे दोन वर्षे (किंवा त्याहून अधिक) जिवंत ठेवेल. चंद्राच्या पृष्ठभागावरील शीर्ष दहा मीटर, पृथ्वीवरील सर्व आठ अब्ज लोकांना सुमारे 100,000 वर्षे श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन प्रदान करेल. परंतु आपण किती प्रभावीपणे ऑक्सिजन काढू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो यावरही हे अवलंबून असेल.