Chandra Grahan 2021: यंदाच्या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला; पहा सर्वात मोठ्या कालावधी साठी होणार्‍या या ग्रहणाचा वेळ काय? कुठे पहाल?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

NASA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पृथ्वी वरून यंदा 21 व्या शतकातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण (Chandra Grahan) 19 नोव्हेंबर दिवशी पाहता येणार आहे. 2021 मधील शेवटचं आणि 2001 ते 2100 या वर्षांमधील सर्वात मोठं ग्रहण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे खगोलप्रेमीना आणि अवकाशीय घटनांबद्दल आकर्षण असलेल्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. स्पेस एजंसीच्या माहिती हे ग्रहण 3 तास 28 मिनिटं चालणार आहे. तर या ग्रहणाच्या काळात 97% चंद्र लाल दिसणार आहे. नक्की वाचा: Chandra Grahan 2021: यंदाच्या वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला, 'या' राशीतील मंडळींना घ्यावी लागणार काळजी .

चंद्रग्रहणाची वेळ

19 नोव्हेंबरला सुरूवातीच्या काळात सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी असणार आहे. NASA च्या माहितीनुसार, ग्रहण युरोपियन वेळेनुसार सकाळी 4 वाजता दिसणार आहे. तर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता असणार आहे. जगभरात वेगवेगळ्या प्रांतानुसार, 18,19 नोव्हेंबरला चंद्रग्रहण पाहता येणार आहे. दरम्यान अमेरिकेमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. अमेरिकेत ईस्ट कोस्ट वर 2-4 AM ET मध्ये हे ग्रहण पाहता येणार आहे. ग्रहण जगात साऊथ अमेरिका, ईस्टर्न आशिया, पॅसिफिक रिजन आणि ऑस्ट्रेलिया भागातून दिसणार आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग

भारतामध्ये चंद्रग्रहण दिसणार नसल्याने त्याचा सुतककाळ नसेल तसेच कोणतेही वेध पाळू नये असे सांगण्यात आले आहे. सामान्यपणे ग्रहणाच्या काळात आजारी व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतो.