Photo Credit: Unsplash

Chandra Grahan 2021: यंदाच्या वर्षातील दुसरे आणि अखेरचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी असणार आहे. या दिवशी कार्तिक पौर्णिमा सुद्धा असणार आहे. कार्तिक पौर्णिमेला गंगा स्नानचे विशेष महत्व असल्याचे मानले जाते. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण हे भारतीय वेळेनुसार दुपारी जवळजवळ 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर ग्रहाणाची समाप्ती ही संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी होणार आहे.(Kojagiri Purnima Masala Doodh Recipe: कोजागिरीच्या रात्री 'कोजागिरी स्पेशल मसाला दूध' बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसेपी)

कार्तिक पौर्णिमेला लागणारे हे चंद्रग्रहण अर्धवट असणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाम मधील काही भाग सोडून देशातील अन्य ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसून येणार नाही आहे. अर्धवट चंद्रग्रहण असल्याने त्या दरम्यान सूतक लागणार नाही आहे. असे मानले जाते की, सूतक काळात शुभ कार्य आणि गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगायची असते. हे चंद्रग्रहण वृष राशीमध्ये लागणार आहे. त्यामुळे या राशीतील व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी स्वरभानू नावाच्या राक्षसाने कपटाने अमृत पिण्याचा प्रयत्न केला. मग चंद्र आणि सूर्याने त्याला पाहिले. जेव्हा त्यांनी भगवान विष्णूला ही माहिती दिली तेव्हा त्यांनी आपल्या सूर्दशन चक्राने राक्षसाचे मस्तक तोडले. मात्र, तोपर्यंत अमृताचे काही थेंब घशातून खाली आल्याने राक्षस दोन राक्षसांमध्ये विभागला गेला. धडाच्या भागाला केतू आणि डोक्याच्या भागाला राहू म्हणतात.

असे मानले जाते की या घटनेनंतर राहू-केतू सूड घेण्यासाठी वेळोवेळी सूर्य आणि चंद्रावर हल्ला करत असतात. त्यांच्या प्रभावामुळे सूर्य आणि चंद्र काही काळासाठी त्यांची शक्ती गमावतात. या घटनेला ग्रहण (चंद्रग्रहण 2021) म्हणतात. कारण हा प्रसंग धार्मिक शास्त्रात अशुभ मानला जातो. त्यामुळे त्या काळात शुभ कार्ये पूर्णपणे निषिद्ध आहेत.