Kojagiri Purnima Masala Doodh Recipe (Photo- Instagram)

अश्विन पौर्णिमा हीच 'कोजागरी पौर्णिमा' (Kojagiri Purnima) किंवा शरद पौर्णिमा (Sharad Purnima) म्हणून साजरी केली जाते. अश्विन पौर्णिमा (Ashwin Purnima) हा भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.यंदा कोजागरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 रोजी आहे. पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता लक्ष्मी रात्री पृथ्वीवर फिरत असतात. या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकमेवा वापरून (Kojagiri Purnima 2021 Date: येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व ) मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते.आपल्यातील बऱ्याच जणांना खास कोजागिरिच्या दिवशी बनवले जाणारे दूध कसे बनवावे याची माहिती हवी असेल आज आम्ही घेऊन आलो आहोत खास कोजागिरी स्पेशल दूध बनवण्याची रेसिपी.

मसाला दूध

दूधामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा आणि शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा समावेश असतो. यामुळे दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कोजागिरीच्या रात्री चंद्र, चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणून त्याच्या छायेखाली बसून दूध आटवून ते पिण्याचा सल्ला दिला जातो.

काही जण साखर, सुकामेवा, जायफळ, वेलची,केशर याचबरोबर खास तयार मिल्क मसाला टाकूनही हे मसाला दूध करतात.तुम्हाला सुद्धा जर मसाला दूध चा मसाला घरी कसा करायचा असेल हे जाणून घ्यायचे असेल तर है व्हिडिओ बघा आणि मिल्क मसाला घरीच तयार करा.

कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये 'शरद पूर्णिमा', ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा', बंगालमध्ये 'लोख्खी पूजो' असे म्हणतात.