Sharad Purnima 2021: सनातन धर्मात शरद पौर्णिमेचे खास महत्व आहे. शरद पौर्णिमेच्या दिवसी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या व्यतिरिक्त भगवान विष्णूची पूजा केल्याने आयुष्यातील धनाची कमतरता दूर होते असे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून ही संबोधले जाते. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला ही शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतनेनुसार, या दिवशी अवकाशातून अमृताच्या थेंबांचा वर्षाव होतो.
कोजागिरी पौर्णिमा ही पश्चिम बंगाल, ओडिशा आणि असाम मध्ये मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. तर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची या दिवशी पूजा करण्यात येते. पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये अशी मान्यता आहे की, मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटापासून मुक्ती मिळते. तसेच सुख-समृद्धी लाभते.(Pune: विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला नेसवली चक्क सोन्याची साडी, पहा फोटो)
>>कोजागिरी पौर्णिमेच्या पुजेचा शुभ मुहूर्त:
हिंदू पंचांगानुसार शरद पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबर, 20 ऑक्टोंबलला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर बुधवारी रात्री 8.20 वाजता समाप्त होईल.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने शरद पौर्णिमेच्या वेळी महारासची रचना केली होती. तसेच चंद्र देवतेची विशेष पूजा ही केली जाते. रात्री आकाशाच्या खाली खीर किंवा दूध ठेवले जाते. असे मानले जाते की, अमृत वर्षामुळे खीर किंवा दूध हे सुद्धा अमृत समान गोते. शास्रानुसार, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो असे सांगितले जाते.