डिसेंबर 2020 मध्ये “Christmas Star” चा योग जुळून आल्यानंतर आता 17 सप्टेंबर म्हणजे काल चंद्र (Moon) आणि शनी (Saturn)आणि आज चंद्र (Moon) आणि गुरू (Jupiter) यांची युती बघायला मिळणार आहे. अवकाशाबद्दल उत्सुकता असलेल्या अनेकांसाठी आजचा दिवस पर्वणी असणार आहे. आज आकाशात ईस्ट- नॉर्थ इस्ट अर्थात पूर्व-ईशान्य (East-Northeast Sky) भागामध्ये चंद्राच्या बाजूला मध्यरात्री गुरूचं देखील दर्शन होणार आहे.
दरम्यान अवकाश न्याहाळण्याचं कौतुक असणार्यांना आकाशातील सर्वात मोठा चंद्र Ganymede देखील पाहता येणार आहे. सोबतच 3 चंद्र io, Europa आणि Callisto देखील त्रिकोण बनवणार आहेत. नक्की वाचा: गुरु ग्रहावरुन पाठविला गेला मेसेज? NASA च्या जूनो ने पकडला Wifi सारखा सिग्नल.
शुक्रवारी म्हणजेच काल (17 सप्टेंबर) आकाशात चंद्रासोबत अनेकांना शनीचं दर्शन झालं. मध्यरात्री 02:33 GMTच्या सुमारास ही युती पहायला मिळली. चंद्र शनीच्या दक्षिणेकडे तीन अंश 45 इंचांनी झुकलेला पहायला मिळाल. यावेळी शनी फिकट रंगात पहायला मिळाला. त्यानंतर आज सोलार सिस्टिम मधील सर्वात मोठा ग्रह अर्थात गुरू चंद्रासोबत पाहण्याची एक दुर्मिळ घटना अनेकांना अनुभवता येणार आहे. टेलिस्कोपच्या मदतीने तुम्हांला अशा या आकाशातील घटना पाहणं सुलभ होणार आहे. अनेकदा यासाठी विज्ञान केंद्रांवर विशेष सोय केली जाते.
दरम्यान कंजंक्शन (Conjunction) हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ दोन गोष्टी एकत्र येणं असा होतो. जेव्हा आकाशात दोन गोष्टी, ग्रह, तारे एकमेकांजवळ येतात तेव्हा याचा वापर केला जातो.