इंडियन स्पेस रिसर्ज ऑर्गनाइजेशन (ISRO) चांद्रयान 2 नंतर आता कार्टोसेट-3 (Cartosat-3) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कार्टोसेट मधील एक येत्या 25 नोव्हेंबरला आणि अन्य दोन कार्टोसेट डिसेंबर महिन्यात लॉन्च होणार आहेत. या सॅटेलाईटच्या माध्यमातून भारताच्या सीमा सुरक्षिततेवर नजर ठेवण्यासाठी फार महत्वापूर्ण मानले जात आहे. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, सीमा सुरक्षेसाठी हे सॅटेलाईट आंतराळात भारताच्या सीमेवर करडी नजर ठेवण्याचे काम करणार आहे.
पीएसएलवी सी-47 रॉकेट श्रीहरिकोटा येथून 25 नोव्हेंबरला 9 वाजून 28 मिनिटांनी लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच पीएसएलवीच्या व्यतिरिक्त त्यासोबत थर्ड जनरेशनच्या अर्थ इमेजिंग सॅटेलाईट कार्टोसेट 3 आणि अमेरिकाच्या 13 कमर्शियल सॅटेलाईट घेऊन जाणार आहेत. इस्रोने याबाबत असे सांगितले आहे की, अमेरिकेच्या 13 नॅनोसॅटेलाईट लॉन्च करण्याबाबची डील न्यु स्पेस इंडिया लिमिटेड यांनी नुकतीच केली. कार्टोसेट-3 आंतराळात 509 किमी दूर कक्षेत लॉन्च होणार आहे.(ISRO कडून Chandrayaan-3 च्या मोहिमेची तयारी सुरु)