इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन (ISRO) पुढील वर्ष म्हणजेच 2020 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्यात चांद्रायन 3 (Chandrayaan-3) मोहिम पार पाडणार असल्याची शक्यता आहे. इस्रोच्या विविध केंद्रातून या मोहिमेबाबत वेगाने काम सुरु करण्यात येत आहे. त्याचसोबत इस्रोकडून चांद्रयान 3 मोहिम कधी पार पडणार हे सुद्धा आताच ठरवण्यात आले आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, त्यांनी काही समित्या बनवल्या आहेत. या समित्यांसोबत ऑक्टोबर ते आतापर्यंत उच्च स्तरीय बैठका पार पडल्या आहेच. या बैठकांनतर असा निर्णय घेण्यात आला आहे की, चांद्रयान 3 मोहिमेत फक्त लॅन्डर आणि रोवर पाठवण्यात येणार आहे. यामध्ये ऑर्बिटर नसणार आहे. कारण चांद्रयान 3 साठी वैज्ञानिक चांद्रयान 2 च्या मोहिमेतील ऑर्बिटरचा उपयोग करणार आहेत. हा ऑर्बिटर पुढील सात वर्ष काम करणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.
इस्रोचे वैज्ञानिक चांद्रयान 2 च्या मोहिमेतील ऑर्बिटरचा उपयोग चांद्रयान 3 साठी करणार आहेत. या वर्षी सप्टेंबर महिन्यात इस्रोकडून चांद्रयान 2 च्या लॅन्डरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये इस्रोला यश आले नाही. तर चांद्रयान 2 मधील ऑर्बिटर काम करत आहे. चांद्रयान 3 साठी बनवण्यात आलेली संपूर्ण टीम चांद्रयान 3 ते 10 बिंदूंपर्यंत लक्ष केंद्रीत करणार आहे. या बिंदूंमध्ये लॅन्डिंगची जागा, योग्य नेव्हिगेशन, सेंसर आणि इंजिनियरिंग या सारख्या गोष्टी सहभागी असणार आहेत.(सध्या कुठे असेल चांद्रयान 2 आणि कसे पोहचेल चंद्रावर?)
चांद्रयान 3 साठी स्थापन केलेली कमिटी ही मोहिम यशस्वी होण्यासाठी लॅन्डरचे पाय अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचसोबत चंद्र आणि पृथ्वी भोवती फेऱ्या कमी फेऱ्या मारण्यासाठी सुद्धा तयारी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, 5 ऑक्टोबरला एक अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, चांद्रयान 2 मधील एक्सपर्ट कमिटीच्या द्वारे देण्यात आलेल्या सिफारशीनुसार लॅन्डरमध्ये बदल आणि त्यात सुधारणा करण्याच्या दिशेने काम करण्यात यावे. मात्र अद्याप लॅन्डरचे वजन आणि त्यामध्ये लावण्यात येणाऱ्या उकरणांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.