चंद्राच्या अंतिम कक्षेत पोहचले चांद्रयान 2, पृष्ठस्थळावर उतरण्यासाठी फक्त 101 किमी अंतर
चांद्रयान 2 (Photo Credits-Twitter)

येत्या 7 सप्टेंबरची वाट अवघा देश पाहत आहे. कारण भारतीय आंतराळासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार असून चांद्रयान 2 (Chandrayaan 2) चंद्राच्या (Moon) पृष्ठस्थळावर उतरणार आहे. तत्पूर्वी आज पहाटे 3.42 मिनिटांनी विक्रम लँन्डर 9 सेकेंदाच्या प्रक्रियेत चंद्राच्या जवळ असणाऱ्या कक्षेत पाठवण्यात आले आहे. तसेच चंद्रापासून विक्रम लँन्डर 35 किमी दूर अंतरावर आहे. त्यानंतर जवळजवळ 44-45 तासांनंतर विक्रम लँन्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यावेळी विक्रम लँन्डर चंद्राच्या सर्वात जवळील अंतर 35 किमी आणि जास्तीत जास्त 101 किमी आहे.

तसेच ऑर्बिटर चंद्रापासून जवळ 96 किमी आणि जास्तीत जास्त 125 अंतरावर आहे. विक्रम लँन्डर आणि ऑर्बिटर आता चंद्राच्या चारही बाजूंनी अंडाकार कक्षेत 2 किमी प्रति सेकेंदच्या वेगाने गोलाकार फिरत आहेत. चांद्रयान 2 चे तीन भाग आहेत. त्यामधील पहिला ऑर्बिटर, दुसरा-विक्रम लँन्डर आणि तिसरा-प्रज्ञान रोवर. तर विक्रम लँन्डरच्या आतमध्येच प्रज्ञान रोवर असून तो चंद्रावर उतरल्यानंतर वेगळा होणार आहे.(चांद्रयान 2 च्या मोहिमेत मराठी चेहरा; अहमदनगरच्या प्रदीप देवकुळे यांच्याकडे संदेशवहनाच्या यंत्रणेची जबाबदारी)

चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यासाठी 6 आणि 7 सप्टेंबरच्या रात्री 1.30 वाजल्यापासून ते पहाटे 5.10 मिनिट पर्यंतची वेळ महत्वपूर्ण असणार आहे. तर पहाटे प्रज्ञान रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर चालण्यास सुरुवात करणार आहे. यावेळी रोवरची स्पीड एक सेंटीमीटर प्रति सेकंद ठेवण्यात येणार असून पुढील 14 दिवस चंद्रावर राहणार आहे.