चंद्रयान 2 मॉडेल फोटो (फोटो सौजन्य-ANI)

भारताचे (India) दुसरे चंद्र अभियान चंद्रयान-2 (Chandrayaan 2) जुलै महिन्यात लॉन्च केले जाणार आहे. तर इस्रो (ISRO) यांच्या मते, चंद्रयान-2 हे एक महत्वपूर्ण मिशन असून ते 9 ते 16 जुलैमध्ये पार पडणार आहे. याच दरम्यान बुधवारी चंद्रयान-2 च्या मॉडेलची पहिली झलक इस्रोने दाखवली आहे.

इस्रोने यापूर्वी चंद्रयान-2 अभियानाबद्दल सांगितले होते. तर या अभियानात 13 पेलोड असणार असून आणि अमेरिका आंतराळ कंपनी नासाचे (NASA) सुद्धा एक उपकरण असणार आहे. मात्र इस्रोने नासाच्या या उपकरणाचे उद्देश स्पष्ट केले नाही आहे.

इस्रोच्या अनुसार, आंतराळात पाठवण्यात येणाऱ्या यानाचे वजन 3.8 टन आहे. तर यानात तीन मोड्युल ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान) असे आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, चंद्रयान-2 6 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार असल्याची शक्यता आहे. ऑर्बिटर चंद्रापासून 100 किमी दुर अंतरावर त्याला प्रदक्षिणा घालणार आहे. तर लँडर (विक्रम) चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर सहजरित्या उतरणार आहे. त्याचसोबत रोवर (प्रज्ञान) आपल्याच जागेवर राहणार आहे.

(Plastic Waste Management: कचऱ्यातून उडणार विमान, टाकाऊ प्लास्टिकपासून होणार इंधन निर्मिती)

तसेच या अभियानात जीएसएलबी मार्क-3 प्रक्षेपण यानसुद्धा वापरण्यात येणार आहे. इस्रोने असे सांगितले होते की, रोवर हे चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग करणार आहे. लँडर आणि ऑर्बिटरवर सुद्धा तोच प्रयोग करण्यासाठी उपकरण जोडण्यात आली आहेत. तर चंद्रयान1 अभियान जवळजवळ 10 वर्षांपूर्वी करण्यात आले होते.