Plastic Waste Management | (Photo Credits: Twitter/@DrSYQuraishi)

Plastic Waste Management: नैसर्गिक इंधन साठा संपण्याची भीती अवघ्या जगाला भेडसावात असताना अमेरिकेतील संशधकांनी एक दिलासादायक शोध लावला आहे. अर्थातच या शोधातून आलेले सकारात्मक निष्कर्श अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. तरीसुद्धा या शोधाचे जगभरातून कौतुक होत आहे. ‘अप्लाईड एनर्जी' मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार अमेरिकन संशोधकांनी आता कचरा आणि टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा शोध लावला आहे. हे इंधन विमानासाठीही वापरता येऊ शकते, असा संशोधकांचा दावा आहे.

वैज्ञानिकांनी पाण्याच्या बॉटल्स आणि टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करण्याची नवी पद्धत शोधून काढली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट यूनिवर्सिटीतील वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. यासाठी या वैज्ञानिकांनी प्लास्टिक अपशिष्टला एक्टिवेटेड कार्बनसोबत विशिष्ट तापमानापर्यंत वितळवले. या संशोधनाबद्दल बोलताना प्रोफेसर हानवू लेई यांनी सांगितले की, 'प्लास्टिक कचरा जगभरातच चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे हा शोध एक मैलाचा दगड ठरेन.' (हेही वाचा, खुशखबर! आता उबरची हवाई कार; ट्रॅफिकच्या त्रासापासून नागरिकांची लवकरच सुटका)

वैज्ञानिकांनी पाणी, दूध, तेल अशा अनेक पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉटल्स या प्रयोगासाठी वापरल्या. या बॉटल्सचे प्लास्टिक सुमारे 3 मिलिमीटर गव्हाच्या दाण्याला जितके दळावे त्याहीपेक्षा अधिक बारीक दळले.त्यानंतर हे प्लास्टिक ट्यूब संयंत्रात 430 ते 571 डिग्री सेल्सियस अंश इतक्या उचंच तापमानापर्यंत एक्टिवेटेड कार्बनवर ठेवण्यात आले. अनेक निरिक्षणं केल्यानंतर संशोधकांना या प्लास्टिकचे तलसदृश्य पदार्थ आढळून आला.