Lunar Eclipse (Photo Credits- Twitter)

वर्षातील पहिले सूर्यग्रहण वैशाख महिन्याच्या अमावस्येला झाले आहे. यानंतर अवघ्या 15 दिवसांनी चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) होणार आहे. पुढील महिन्यात 5 मे रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. याच दिवशी बुद्ध पौर्णिमा देखील साजरी केली जाईल. या वर्षी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. भारतीय वेळेनुसार, 5 मे रोजी होणारे चंद्रग्रहण रात्री 8:45 पासून सुरू होईल आणि रात्री 1:00 वाजता संपेल. चंद्रावर पृथ्वीची सावली केवळ एका बाजूला असल्याने हे ग्रहण सर्वत्र दिसणार नाही. हे युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्क्टिका येथे पाहिले जाऊ शकते.

वैज्ञानिकदृष्ट्या, जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. पुराणानुसार जेव्हा राहू चंद्राला ग्रासतो तेव्हा चंद्रग्रहण होते. सूर्य आणि चंद्रग्रहणापूर्वी सुतक कालावधी सुरू होतो. चंद्रग्रहणापूर्वीचा सुतक कालावधी अशुभ मानला जातो. चंद्रग्रहणाची परमग्रास वेळ रात्री 10.53 आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो, परंतु वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी येथे वैध राहणार नाही.

परंतु अजूनही अनेक लोक ग्रहणावेळी सुतक कालावधीचे पालन करतात. चंद्रग्रहणाच्या वेळी स्वयंपाक करणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करू नये. यासोबतच घराच्या मंदिराचे दरवाजे बंद करावे किंवा पडदा लावावा. चंद्रग्रहण काळात झोपू नये. जास्तीत जास्त देवाचा जप करत राहा. ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच, गर्भवती महिलांनी यावेळी चाकू, कात्री वापरणे टाळावे. तसेच, या काळात झाडांना स्पर्श करू नये, असे सांगितले जाते. (हेही वाचा: Nasa New Planet: नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करून संशोधकांनी प्रथमच शोधला पृथ्वीसारखा एक्सप्लॅनेट)

जेव्हा पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडते तेव्हा त्याला उपच्‍छाया चंद्र ग्रहण म्हणतात. हे चंद्र ग्रहणही असेच आहे. दरम्यान, 2023 मधील दुसरे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण 2023 सालातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका आणि आफ्रिकेतून पाहता येणार आहे.