Samsung Galaxy M30 आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Samsung Galaxy M30 आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत आणि खासियत (Photo Credits-Twitter)

सॅमसंग (Samsung) कंपनी आपले नवं मॉडेल असलेला Samsung Galaxy M30 आज बुधवारी (28 फेब्रुवारी) भारतात (India) लॉन्च करणार आहे. तसेच कंपनीने संध्याकाळी 6 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. तर गॅलेक्सी एम (Galaxy M) सीरिजमधील हे तिसरे नवे मॉडेल आहे. यासह गॅलेक्सी एम सीरिजमध्ये Galaxy M30, Galaxy M20 आणि Galaxy M10 असे मॉडेल ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. साऊथ कोरियन कंपनी सॅमसंग यांनी गॅलेक्सी एम 30 या स्मार्टफोनसाठी 6.38 इंचाचा Super AMOLED Infinity-U Display, triple rear camera setup सह ultra-wide angle lens देण्यात आली आहे. तसेच 5,000 mAh च्या बॅटरीची सोय करण्यात आली आहे.

या स्मार्टफोनच्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर, Galaxy M30 च्या स्मार्टफोनची सुरुवात भारतात 15,000 रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. Galaxy M20 ची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली असून 3GB RAM/32GB स्टोरेज देण्यात आले आहे. तर 4GB RAM/64GB RAM असणाऱ्या स्मार्टफोन M20 साठी ग्राहकांना 12,990 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र Galaxy M10 ग्राहकांना फक्त 7,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत या स्मार्टफोनसाठी 2GB RAM/16GB स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच M10 च्या 3GB RAM/32GB स्टोरेजसाठी ग्राहकांना 8,990 रुपये मोजावे लागणार आहेत.(हेही वाचा-Samsung ने लॉंंच केला फोल्डेबल फोन; तब्बल 6 कॅमेरे, 1 लाख 41 किंमत जाणून घ्या इतर फीचर्स)

गॅलेक्सीच्या एम 30 स्मार्टफोनसाठी फिचर्स 6.4 इंच पूर्ण HD+ (1080x2220 pixels) डिस्प्ले आणि Exynos 7904 SoC देण्यात आले आहे. तसेच गॅलॅक्सी एम 20 च्या प्रोसेसरसाठी 4GB चा LPDDR4 RAM देण्यात आला आहे.