Realme लवकरच घेऊन येणार आणखी एक स्वस्त स्मार्टफोन C25, लॉन्चिंग डेटसह फिचर्सचा सुद्धा खुलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

रिअलमी आपली C सीरिज अंतर्गत आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी एक नवा स्मार्टफोन Realme C25 नावाने बाजारात तो उतरवणार आहे. हा फोन अधिकृतरित्या येत्या 23 मार्चला लॉन्च केला जाणार आहे. सध्या कंपनी हा स्मार्टफोन इंडोनेशिया मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र अशी अपेक्षा केली जात आहे की, लवकरच भारतासह अन्य देशात सुद्धा तो खरेदीसाठी उपलब्ध करुन दिला जाईल. याचे काही खास फिचर्स सुद्धा समोर आले आहेत. Realme C25 मध्ये दमदार बॅटरी ते युजर्सला शानदार क्वालिटी पर्यंतचे खास फिचर्स मिळणार आहेत.

Realme C25 संबंधित कंपनीने इंडोनेशियाच्या बेवसाइटवर एक डेडिकेट पेज जाहीर केले आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे की, Realme C25 सह कंपनी Realme C21 सुद्धा लॉन्च करणार आहे. हा कार्यक्रम 23 मार्चला दुपारी 1.30 वाजता आयोजित केला जाणार आहे. याचे लाइव्ह स्ट्रिम कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनलवर पाहता येणार आहे. खरंतर Realme C21 स्मार्टफोन इंडोनेशिया पूर्वी मलेशियामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आला आहे.(Redmi Smart TV X Series: रेडमी चे 3 स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च; 32,999 रुपयांपासून उपलब्ध)

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, C25 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आआहे. जो स्क्वायर आकारात येणार आहे. फोनचा प्रायमरी सेंसर 48MP चा असू शकतो. या व्यतिरिक्त फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. अशी अपेत्रा केली जात आहे की, Realme C21 स्मार्टफोनचे फिचर्स मलेशियात लॉन्च झालेल्या मॉडेल सारखेच आहेत.(Nokia घेऊन येणार दोन स्वस्ते 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च)

समोर आलेल्या माहितीनुसार, Realme C25 मध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G70 गेमिंग प्रोसेसरवर काम करणार आहे. म्हणजेच युजर्सला गेमिंगचा उत्तम अनुभव मिळणार आहे. फोनमध्ये वॉटरट्रॉप नॉच स्टाइलसह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाणार आहे. यामध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर दिला जाणार आहे. त्याचसोबत युजर्सला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.