Nokia घेऊन येणार दोन स्वस्ते 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च
नोकिया स्मार्टफोन्स (Photo Credits: Nokia Official Website)

HMD ग्लोबल कंपनी दोन नवे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोनचा समावेश आहे. नोकियाचे दोन्ही स्मार्टफोन 5जी कनेक्टिव्हिटीसह उतरवले जाऊ शकतात. फोन खिशाला परवडतील अशा रेंजमध्येच लॉन्च केले जाणार आहेत. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Nokia X20 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480 5G चिपसेटसह उतरवला जाऊ शकतो. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाणार आहे. Nokia X20 जवळजवळ 349 युरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोन दोन कलर ऑप्शन ब्लू आणि सँडमध्ये उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो.

कंपनी नोकिया एक्स10 स्मार्टफोन 5G सपोर्टसह उतरवला जाऊ शकतो. फोन 300 युरो (जवळजवळ 26 हजार रुपये) मध्ये लॉन्च केला जाईल. सफेद आणि ग्रीन दोन रंगात स्मार्टफोन येणार आहे. Nokia X10 आणि Nokia X20 हे Snapdragon 480 5G प्रोसेसरसह येणार आहे. HMD Global कडून येत्या 8 एप्रिलला नोकियाच्या स्मार्टफोनसाठी लॉन्चिंग इवेंट ठेवण्यात आला आहे. तेव्हा Nokia X10, X20 आणि Nokia G10 स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Nokia G10 स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो Octa Core प्रोसेसरला सपोर्ट करणार आहे. Nokia G10 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असणार आहे.(Realme आणि Xiaomi ला टक्कर देण्यासाठी आला Made In India चा अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्ही, 18 मार्चला होणार लॉन्च)

कंपनी नोकिया 8.3 स्मार्टफोनच्या 5G वेरियंट लवकरच लॉन्च केला जाणार आहे. यामध्ये 6.5 इंचाचा QHD+डिस्प्ले मिळणार असून त्याचा रिफ्रेश रेट 120HZ असणार आहे. प्रोसेसरच्या आधारावर फोनमध्ये Qualcomm Snapdragon 775G प्रोसेसर सपोर्ट मिळणार आहे. त्याचसोबत पॉवरबँकसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 108MP चा पेंटा कॅमेरा सेटअप मिळणार आहे.