Redmi Smart TV X Series (Photo Credits: Redmi India)

Redmi Smart TV X Series: रेडमी (Redmi) ने बुधवारी भारतात तीन दमदार स्मार्ट टीव्ही (Smart TV)लॉन्च केले. रेडमी ने स्मार्ट टीव्ही एक्स सिरीज अंतर्गत तीन मॉडल सादर केले आहेत. जे तीन वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. यात 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचाच्या स्मार्ट टीव्ही चा समावेश आहे. रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स 50 मॉडलची किंमत 32,999 रुपये आहे. रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स सीरीज 26 मार्च 2021 रोजीपासून अॅमेझॉन इंडिया (Amazon India), एमआय होम (Mi Home) आणि एमआय स्टुडिओ (Mi Studio) च्या ऑफलाईन स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स सीरीज मध्ये पॅचवॉल युआय (PatchWall UI)देण्यात आला आहे. जो अॅनरॉईड टीव्ही 10 (Android TV 10) या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत आहे. रेडमीच्या या टीव्ही मध्ये 4k एचडीआर एलईडी डिस्प्ले देण्यात आला असून हा टीव्ही गुगल असिस्टेंट वर देखील काम करतो.

Redmi India Tweet:

पहा व्हिडिओ:

रेडमीच्या या स्मार्ट टीव्ही मध्ये 64 बिट क्वॉड-कोर ए55 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरोज देण्यात आला असून रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स सीरीजमध्ये 10W चा साऊंड आऊटपूट देण्यात आला आहे. रेडमीच्या या स्मार्ट टीव्ही मध्ये गुगल क्रोमकास्ट इनबिल्ट आहे.

भारतात स्मार्ट टीव्ही आणणार असल्याचे चीनची तंत्रज्ञान कंपनी शाओमीने म्हटले आहे. भारताच्या वेगाने वाढणार्‍या स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा कंपनीचा मानस आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख ईश्वर नीलकंठण म्हणाले की, "कंपनीने 2018 मध्ये भारतात स्मार्ट टीव्ही सादर केला. तेव्हापासून देशात स्मार्ट टीव्हीचे मार्केट वाढवणे हाच आमचा उद्देश होता."