Realme C12 चे नवे वेरियंट भारतात सेलसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Realme C12 (Photo Credits: Twitter)

रिअलमीने नुकताच भारतीय बाजारात आपला लो बजेट रेंज स्मार्टफोन Realme C12 नव्या स्टोरेजचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नव्या मॉडेलमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमोरी दिली गेली आहे. तर आता स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर सेलसाठी उपलब्ध करुन दिला आहे. युजर्सला नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी करता येणार आहे.(प्रतिक्षा संपली! Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन आणि Enco X TWS ईयरबड्स अखेर भारतात लाँच, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये)

Realme C12 च्या नव्या मॉडेलची किंमत 9999 रुपये आहे. याच्या 3GB च्या जुन्या मॉडेलची किंमत 8,999 रुपये किंमतीत उपलब्ध करुन दिला गेला आहे. हा स्मार्टफोन पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर रंगात सेलसाठी उपलब्ध करुन दिला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर स्मार्टफोनवर कोणताही ऑफर मात्र उपलब्ध करुन दिलेली नाही. परंतु जर तुम्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावरुन खरेदी केल्यास तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सजेंच ऑफरचा लाभ घेता येणार आहे.(Samsung Galaxy S21 Series च्या प्री बुकींगला सुरुवात; 29 जानेवारी रोजी पहिला सेल)

रिअलमी कंपनीचा हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड10 ओएस वर आधारित आहे. तो MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले ही दिला गेला आहे. जो 720X1600 पिक्सलच्या स्क्रिन रेज्यॉल्यूशनसह येणार आहे. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. जो मायक्रोएसडीच्या मदतीने वाढवता येणार आहे.