Samsung Galaxy S21 Series च्या प्री बुकींगला सुरुवात; 29 जानेवारी रोजी पहिला सेल
Samsung Galaxy S21 Series (Photo Credits: Samsung India)

सॅमसंग (Samsung) ने गॅलेक्सी एस 21 सीरजची (Galaxy S21 Series) प्री-बुकींग (Pre-Booking) 15 जानेवारी पासून सुरु केली आहे, त्यामुळे ग्राहक आता तिन्ही वेरिएंटची बुकींग करु शकतात. तीन वेरिएंट्स पुढीलप्रमाणे: Galaxy S21 Ultra, Galaxy S21+ आणि Galaxy S21. प्री बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅलेक्सी स्मार्ट टॅग फ्री आणि सॅमसंग ई-शॉपचे 10,000 रुपयांचे व्हाऊचर्स मिळणार आहेत. प्री बुकींग केलेल्या ग्राहकांना 25 जानेवारीपासून डिलिव्हरी मिळायला सुरुवात होईल. तर Galaxy S21 Series चा सेल 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

Galaxy S21 च्या 8GB+128GB चा वेरिएंट 69,999 रुपयांना मिळेल. हा वेरिएंट Phantom Violet, White, Pink, Grey रंगात उपलब्ध असेल. तर Galaxy S21 च्या 8GB+256GB ची किंमत 73,999 रुपये इतकी असेल. हा स्मार्टफोन Phantom Violet, White, Grey या रंगात मिळेल. Galaxy S21 चे 8GB+128GB वेरिएंट 81,999 रुपयांना खरेदी करु शकाल. यात Phantom Violet, Sliver, Black हे रंगांचे पर्याय आहेत. तर 8GB+256GB वेरिएंट 85,999 रुपयांना उपलब्ध असून यात Phantom Violet, Sliver, Black या रंगात मिळेल.

Samsung Mobile Tweet:

गॅलेक्सी एस 21 अल्ट्राच्या 12GB+256GB या टॉप एन्ड मॉडलची किंमत 105,999 रुपये इतकी असून हा मॉडल Phantom Black, Sliver रंगात उपलब्ध आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राच्या 16GB+512GB वेरिएंटची किंमत 116,999 रुपये इतकी असून हा Phantom Black  रंगात उपलब्ध आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्रावर 10,000 रुपये, गॅलेक्सी एस 21 + वर 7000 रुपये तर गॅलेक्सी एस 21 वर 5000 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. प्री बुकींग करणाऱ्या सर्व ग्राहकांना गॅलेक्सी तर्फे एक स्पेशल ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना गॅलेक्सी वॉच अॅक्टीव्ह 2 किंवा गॅलेक्सी बर्ड प्लस आणि Travel Adapter  मिळणार आहे.

हा फोन खरेदी करताना HDFC बँक कस्टमर्संना 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. गॅलेक्सी एस 21+, गॅलेक्सी एस 21 आणि गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा या तिन्ही मोबाईल डिव्हाईसेसमध्ये  Exynos 2100 चिपसेट दिला असून या तिन्ही डिव्हाईसेसमध्ये 5 जी सर्व्हिस अनएबल आहे.