Oppo Reno 5 Pro 5G and Enco X TWS Earbuds (Photo Credits: Twitter/Oppo Official)

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला ओप्पोचा (Oppo) नवा 5G स्मार्टफोन Oppo Reno 5 Pro अखेर आज भारतात लाँच झाला आहे. त्याचबरोबर ओप्पो कंपनीचे Enco X TWS ईयरबड्स देखील भारतात लाँच झाले आहे. Oppo Reno 5 Pro स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 64MP चा क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. येत्या 22 जानेवारीपासून हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन आज लाँच होताच फ्लिपकार्टवर याची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. येथे HDFC कार्ड आणि ICICI कार्डधारकांना खरेदीवर 10% ची सूट मिळणार आहे.

Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 35,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यात 8GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.55 इंचाची फुल एचडी OLED डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात ऑक्टा कोर मिडियाटेक डायमेंसिटी 1000+SoC आहे. यात तुम्हाला 256GB पर्यंत स्टोरेज पर्याय देखील उपलब्ध आहे.हेदेखील वाचा- Oppo A93 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात f/1.7 लेन्स दिले गेले आहे. त्याचबरोबर यात 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा मोनो क्रोम सेंसर दिला गेला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G सपोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आले आहे. त्याशिवाय यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा देण्यात आले आहे. या फोनमध्ये 4350mAh ची बॅटरी आहे जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.

Oppo Enco X TWS ईयरबड्सची वैशिष्ट्ये

या ईयरबड्सची किंमत 9,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ईयरबड्सदेखील 22 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. याची प्री बुकिंग सुद्धा फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. याच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, यात सिलिकॉन इयर टिप्सचा वापर केला गेला आहे. हा चार्जिंग केस सह येता यात USB टाइस-सी वायर्ड आणि Qi वायरलेस चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिला गेला आहे. यात ब्लूटुथ 5.2 चे सपोर्ट मिळेल.

Oppo Enco X TWS ईयरबड्स खास वैशिष्ट्य म्हणजे यात 25 तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. यात ANC बंद झाल्यानंतर ईयरफोन 5.5 तासांची बॅटरी मिळेल. तर चार्जिंग केससह 20 तासांची बॅटरी मिळेल. यात 535mAh ची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात SBC चे सपोर्ट, AAC आणि LHDC ब्लूटुथ कोड्स सपोर्ट मिळेल. हा IP54 सह येत असल्यामुळे याचे धूळ, पाणी यापासून बचाव होईल. म्हणजेच यामुळे हे ईयरबड्स खराब होणार नाही.