Oppo A93 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
OPPO A93 5G (Photo Credits: Twitter)

Oppo A93 5G बद्दल अधिक गोष्टी समोर आल्या आहेत. अशातच आता कंपनीने यावर पूर्णविराम लावत अखेर स्मार्टफोन अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. Oppo A93 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसरवर काम करणार आहे. या मध्ये फोटोग्राफीसाठी 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.तर जाणून घ्या या स्मार्टफोनच्या किंमतीसह स्पेसिफिकेशन संदर्भात अधिक माहिती.(Amazon Great Republic Day सेल 19 जानेवारी पासून होणार सुरु, 100 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार)

ओप्पो कंपनीच्या ए93 5जी स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरियंटमध्ये येणार आहे. फोनच्या एका वेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिला आहे. तर दुसऱ्या वेरियंटमध्ये 8GB रॅमसह येणार आहे. 128GB इंटरनल स्टोरेज ही दिला जाणार आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला गेला आहे. याची सुरुवाती किंमत 22,500 रुपये आहे. फोन 20 जानेवारी पासून सेलसाठी उपलब्ध होणार आहे. सिल्वर, ब्लॅक आणि ऑरोरा कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. अद्याप कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात याच्या लॉन्चिंग बद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.

स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन अॅन्ड्रॉइड 11 ओएसवर उतरवला असून Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसवर काम करणार आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. जो पंच होल डिझाइन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे. हा दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उतरवला गेला आहे. (OnePlus Band ची आज भारतीय बाजारात झाली एन्ट्री, काय आहे यात विशेष?)

फोटोग्राफीसाठी युजर्सला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा दिला आहे. यामध्ये 2MP चा मॅक्रो सेंसर आणि 2MP चा मोनोक्रोम सेंसर दिला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये पंच होल कटआउटसह 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर ही मिळणार आहे.