Amazon Great Republic Day सेल 19 जानेवारी पासून होणार सुरु, 100 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार
Amazon | (File Photo)

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India यांनी आपला सर्वाधिक खास Great Republic Day सेलची घोषणा केली आहे. तर अॅमेझॉनचा रिपब्लिक सेल येत्या 20 जानेवारी पासून सुरु होणार असून 23 जानेवारी पर्यंत असणार आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन-ब्युटी, होम-किचन, टीव्ही आणि घरात लागणाऱ्या गोष्टींवर बंपर डिस्काउंटसह शानदार ऑफर ही मिळणार आहे. त्याचसोबत Amazon Prime युजर्ससाठी हा सेल 19 जानेवारीलाच सुरु होणार आहे.

अॅमेझॉनच्या सेल मध्ये दिल्या जाणाऱ्या ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास SBI कडून क्रेडिट कार्ड होल्डर्सला 10 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त सेलमध्ये उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट्सवर नो-कॉस्ट ईएमआय माध्यमातून ही खरेदी करता येणार आहे. तसेच सेलमध्ये 40 हजारांहून अधिक गोष्टी नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या वस्तूंच्या किंमती 99 रुपयांपासून सुरु होणार आहे. या व्यतिरिक्त सेलमध्ये फॅशन प्रोडक्टवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.(Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची भारतात जबरदस्त विक्री; पहिल्या सेलमध्ये विकले 200 कोटी रुपयांचे स्मार्टफोन)

Tweet:

ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये स्मार्टफोन ही कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. त्यावेळी ग्राहकांना 4999 रुपयांच्या सुरुवाती किंमती मध्ये स्मार्टफोन विकत घेता येणार आहे. तसेच ग्राहकांना सर्व डिवाइस नो-कॉस्ट ईएमआय सारखे ऑफर मिळणार आहे.

तसेच ग्राहकांना किचन आणि होम प्रोडक्ट्स 79 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करता येणार आहेत. त्याचसोबत Cookware आणि Dining प्रोडक्ट्स 149 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करता येणार आहे. Home & Décor च्या वस्तू 99 रुपये आणि Tool & Home Improvement या 79 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.