Realme 3 pro (Photo Credits-Twitter)

रियलमी कंपनीने आपल्या नवीनतम फिचर्ससह लाँच केलेला नवा स्मार्टफोन रियलमी 3 प्रो (Realme 3 Pro) आज फ्लॅशसेल साठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ह्याआधी ज्या ग्राहकांची किंवा रियलमी च्या चाहत्यांची हा स्मार्टफोन घेण्याची संधी हुकली त्यांच्यासाठी आजचा फ्लॅशसेल ही योग्य संधी असेल. आज दुपारी 12 ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर हा फ्लॅशसेल सुरु होईल. तसेच आजच्या फ्लॅशसेलमध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे Axis Bank Buzz credit Card असलेल्या ग्राहकांना ह्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 5% ची सूट मिळणार आहे.

Realme 3 Pro ची किंमत आणि रंग:

ह्या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB प्रकारातील फोनची किंमत 13,999 रुपये आहे तर 6GB रॅम आणि 64GBस्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB ची किंमत अनुक्रमे 15,999 आणि 17,999 रुपये इतकी असेल. हा स्मार्टफोन कार्बन ग्रे, नायट्रो ब्लू आणि जांभळ्या रंगात उपलब्ध आहे.

'Redmi Note 7 Pro' ला टक्कर देण्यासाठी 22 एप्रिलला लॉन्च होणार Realme 3 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Realme 3 Pro वैशिष्ट्ये:

या स्मार्टफोनमध्ये 4045mAh इतकी बॅटरी लाईफ देण्यात आली असून, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर, एड्रिनो 616 GPU ला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 6.3 इंचाची IPSFHD डिस्प्ले देण्यात आली असून, त्याचे रिझोल्युशन 2340x1080 पिक्सेल इतके आहे.

Realme 3 Pro कॅमेरा:

ह्यात 25 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून 16 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.