Online Payment | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

दिवाळी हा मोठ्या जल्लोषाचा सण असतो. चांगले मुहूर्त, प्रियजनांना भेटवस्तू यांची रेलचेल असल्याने आपोआपच थोडी खरेदीजास्त होते. यंदा कोरोना संकट असल्याने हीच खरेदी ऑनलाईन करण्याकडे अनेकांचा कल आहे. पण ऑनलाईन खरेदी म्हणून व्यवहार देखील ऑनलाईन करण्याच्या नादात काहींची फसवणूक देखील होऊ शकते. डिजिटल पेमेंटमध्ये अनेकजण काही कॅश रिवॉर्डचं आमिष दाखवून तुमची लूट करू शकतात. म्हणूनच या सणासुदीच्या काळात इंटरनेट बॅंकिंग किंवा फोन बॅंकिंगच्या माध्यमातून हॅकर्सपासून सावधान रहा. तुमची फसवणूक होनार नाही याची काळजी घ्या.

आरबीआय म्हनजेच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 6 विविध बॅंक फ्रॉड्सबाबत नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेच्या खात्यामध्ये काही अनधिकृतरित्या कोणते व्यवहार होत असतील तर त्याची सूचना तात्काळ तुमच्या बॅंकेच्या शाखेला द्या. यामुळे मोठं आर्थिक नुकसान टाळायला मदत होईल.

क्युआर कोड फ्रॉड

बॅंकेच्या खात्यामध्ये अफरातफर करण्यामध्ये क्यु आर कोड फ्रॉड हा सहज वापरला जातो. आर्थिक व्यवहारांसाठी जेव्हा एखाद्या व्यक्तीला क्यु आर कोड लिंक पाठवली जाते तेव्हा हॅकर्स त्याचा मोबाईल फोनमधील आलेला क्युआर कोड स्कॅन करतो. यामुळे बॅंक खात्यातून पैसे काढता येऊ शकतात.  दुकानदार व व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार 'हे' काम; रिझर्व्ह बँकेने बदलला QR Code चा नियम.

युपीआय लिंक

अनेकजण युपीआय द्वारा व्यवहार करण्याला प्राधान्य देतात. हा बॅंकिंगचा एक सुरक्षित पर्याय असला तरीही त्यामधूनही लोकांची फसवणूक होऊ शकते. युपीआय लिंक फ्रॉड मध्ये व्यक्तीला डेबिट लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर पिन नंबर टाकल्यानंतर पैसे कापले जातात. म्हणून अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. UPI च्या माध्यमातून पैसे पाठवताना 'या' पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होईल

एटीएम स्किमिंग

एटीएम स्किमिंगद्वारा हॅकर्स कार्डमधील डाटा चोरू शकतात. एटीएम मध्ये कार्ड रिडर स्लॉटमध्ये डिवाईस लावून एटीएममधील माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे बॅंकेच्या जवळील किंवा नेहमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरचा वापर करा. निर्जळ स्थळी काळजीपूर्वक व्यवहार करा.

फेक कॉल

फसवणूक करणारी व्यक्ती बॅंकेच्या नावाने फेक कॉल करून तुमची माहिती विचारून खातं लुटू शकते. त्यामुळे त्याची काळजी घ्या. कधीही फोन कॉलवर तुमची, बॅंक खात्याबद्दलची कोणतीही खाजगी माहिती, पिन नंबर शेअर करू नका. तुमचं अकाऊंट ठराविक दिवसांनी तपासून पाहत रहा.

डेबिट क्रेडिट कार्ड क्लोनिंग

तुमच्या डेबिट क्रेडिट कार्डची माहिती चोरून काही जण त्याचं नकली कार्ड बनवू शकतात. त्या ड्युपलिकेट कार्डचा वापर करून सहज पैसे काढता येऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप फेक कॉल

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस, फेक कॉलच्या माध्यमातूनही आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. कोणत्याही अनोळखी नंबरचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल उचलणं टाळा.

दरम्यान यंदा सुरक्षित दिवाळी ही आरोग्याच्या दृष्टीने जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती आर्थिकदृष्ट्या देखील आहे. खर्च जपून करा. ऑनलाईन व्यवहार करताना पुरेशी काळजी घय. खोट्या वेबसाईट्सवर तुम्ही लॉगिंग करत नाहीत ना? याची एकदा खबरदारी बाळगा.