UPI च्या माध्यमातून पैसे पाठवताना 'या' पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होईल
UPI (Photo Credits-Facebook)

दररोजच्या जीवनात सध्या ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार केले जातात. त्यामध्ये ऑनलाईन पेमेंटची संख्या फार प्रमाणात आहे. तसेच डिजिटल पद्धतीने काम करणारे बरेसचे अॅप आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु हे अॅप वापरताना त्यासाठी काही नियम आणि अटी लागू केलेल्या असतात.

तर सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत असलेली UPI सुविधेच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदामध्ये पैसे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवता येतात. मात्र डिजिटल पद्धतीने पैसे पाठवत असाल तर त्यापूर्वी सावधगिरी बागळा. अन्यथा तुमची फसवणुक होण्याची शक्यता फार असते. तर पाहूयात UPI द्वारे जर तुम्ही व्यवहार करत असल्यास कशी काळजी घ्यावी.

- कोणत्याही बँकेतून तुमच्या व्यक्तीगत खात्याबद्दल फोनवरुन विचारले जात नाही. तसेच तुमचा बँक खाते क्रमांक, UPI पिन क्रमांक किंवा OTP क्रमांक कधीच कोणाला देऊ नका. (Reliance Jio GigaFiber ची स्पेशल ऑफर; केवळ 600 रुपयांत मिळेल ब्रॉडब्रँड, लँडलाईन आणि टीव्ही कॉम्बो पॅक)

-UPI डाऊनलोड करतेवेळी तो अधिकृत कंपनीचा आहे की नाही हे तपासून घ्यावे.

-कोणतेही चुकीचे अॅप डाऊनलोड करण्यापासून दूर रहा.

-सुरक्षित अॅन्टीव्हायरसचा उपयोग करा.

त्यामुळे जर तुम्ही युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करत असल्यास वरील गोष्टी लक्षात ठेवा. तसेच UPI अ‌ॅप मुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अ‍ॅप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी करता येते.