आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करणाऱ्या रिलायन्स जिओने आता एक नवी ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला महिन्याभरासाठी ब्रॉडब्रँड-लँडलाईन-टीव्ही कॉम्बो सेवा मिळणार आहे. या सुविधेसह रोज 1000 रुपयांपर्यंत स्मार्ट होम नेटवर्कच्या कमीत कमी 40 उपकरणं जोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
सध्या रिलायन्स जिओ नवी दिल्ली आणि मुंबईत GigaFiber चे परिक्षण करत आहे. एका राऊटरसाठी वन टाईम डिपॉझिट फक्त 4500 रुपये आहे. या सेवेत 100 मेगाबाईट प्रति सेकंद (mbps) वर 100 गीगाबाईट (GB) डेटा मिळत आहे. यासाठी पुढच्या महिन्यात टेलिफोन आणि टेलिव्हिजन सेवा जोडल्या जातील. त्याचबरोबर या तिन्हीही सेवा सुमारे वर्षभरासाठी मोफत मिळतील. (मुकेश अंबानी यांच्या Jio GigaFibre चे होणार लॉन्चिंग; DTH-केबल TV मार्केटमध्ये रंगणार Price War; ग्राहकांना मिळणार फायदा)
लँडलाईनच्या अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुरु झाल्यावर टेलिव्हिजन चॅनल्स इंटरनेट (इंटरनेट प्रोटोकॉल प्रोटोकॉलवर प्रसारीत केले जाईल. या सर्व ऑफर्स ओएनटी (ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल) बॉक्स राउटरच्या माध्यमातून संचालित केल्या जातील. तसंच 40-45 उपकरणांशी म्हणजेच फोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर स्मार्ट उपकरणांशी संलग्न होतील. सेवेत गेमिंग, क्लोज-सर्किट टेलिव्हिजन आणि स्मार्ट होम सिस्टम याचा देखील समावेश असेल. (Jio चा नवा प्लॅन; 251 रुपयांत रोज 2GB डेटासह विशेष ऑफर्स)
ट्रिपल कॉम्बो सात दिवसांच्या कॅच अप पर्यायासह लँडलाईन आणि 100 mbps ब्रॉडब्रँडसह 600 चॅनल्स सादर करण्यात आहेत. याची किंमत 600 रुपये प्रति महिना असेल. इतर स्मार्टफोन सेवांचा लाभ घेण्यासाठी टॅरिफ आणि इतर योजना याच्या माध्यमातून अधिक खर्च होऊ शकतो. टॅरिफ प्रति महिना 1000 रुपयांपर्यंत जावू शकतो.
कमीत कमी 100 MPbs च्या गतीसह 1 गीगाबाईट प्रति सेकंद (gbps) पर्यंत येऊ शकतो. Jio GigaFiber मध्ये देखील CCTV फुटेज आणि क्लाऊडच्या आधारावर डेटा संग्रहीत करण्याची क्षमता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची अंतिम वार्षिक बैठकीत चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की, "GigaFiber जागतिक स्तरावर सर्वात मोठा ग्रीनफिल्ड फिक्स्ड लाईन ब्रॉडब्रँड रोलआऊट होईल. याचा फायदा भारतातील 1100 शहरांना होईल."