Jio चा नवा प्लॅन; 251 रुपयांत रोज 2GB डेटासह विशेष ऑफर्स
Reliance Jio (Photo Credit: LinkedIn)

आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio) नेहमीच नवनवे प्लॅन्स सादर करत असते. त्यामुळे ग्राहकही जिओच्या नव्या प्लॅन्सची आतुरतेने वाट पाहत असतात. आता देखील रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे. 251 रुपयांच्या या नव्या प्लॅनमध्ये 4G चा प्लॅन मिळणार आहे. यात दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. जाणून घेऊया या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल...

या नव्या पॅकचे नाव जिओ 'क्रिकेट सीजन डेटा' आहे. हा पॅक विशेषत: आयपीएल टी-20 साठी लॉन्च करण्यात आला आहे. या पॅकची किंमत 251 रुपये आहे. (मुकेश अंबानी यांच्या Jio GigaFibre चे होणार लॉन्चिंग; DTH-केबल TV मार्केटमध्ये रंगणार Price War; ग्राहकांना मिळणार फायदा)

या प्लॅनअंतर्गत युजर्सला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडीटी 51 दिवसांची आहे. याचा अर्थ या प्लॅनमध्ये तुम्हाला 102 जीबी डेटा मिळेल. हा रिचार्ज तुम्हाला वेबसाईट आणि माय जिओ अॅपच्या माध्यमातून करता येईल.

त्याचबरोबर या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर अन्य ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. यात लकी युजर्सला आवडत्या टीमसोबत सेल्फी घेण्याची संधी मिळू शकते. तसंच आवडत्या टीमची जर्सी, टोपी आणि बॅच देखील मिळेल. इतकंच नाही तर आयपीएल सामन्याचे तिकीटही जिंकण्याची संधी या ऑफर अंतर्गत दिली जात आहे.