Amazon Great Indian Festival Sale 2021: येत्या 3 ऑक्टोंबर पासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या सेलला होणार सुरुवात
Amazon Great Indian Sale (Photo Credits-Twitter)

Amazon Great Indian Festival Sale 2021:  ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडिया यांचा येत्या 3 ऑक्टोंबर पासून Amazon Great Indian Sale सुरु होणार असल्याचे रविवारी घोषित करण्यात आले आहे. या सेलमध्ये लाखोंच्या संख्येने लहान उद्योजकांसह 450 शहरातील 75 हजार लोकल शॉप्स यामध्ये सहभागी होणार आहे. प्रत्येक जण आपल्याकडील .युनिक वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे.(Myntra Big Fashion Festival: मिंत्रावर 3 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान चालणार बिग फॅशन फेस्टिव्हल, विविध फॅशन ब्रँडवर मिळणार दमदार सूट)

कंपनीने एका विधानात असे म्हटले आहे की, आमचे मुख्य उद्देष हे प्रामुख्याने भारतातील ग्राहक आणि लहान उद्योजकांचा विश्वास जिंकणे आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल हा 3 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. म्हणजेच प्राइम युजर्सला त्याच्या एक दिवस आधीपासूनच त्याचे एक्सेस मिळणार आहे.

अॅमेझॉनच्या या सेलप्रमाणेच अॅमेझॉन लंचपॅड, अॅमेझॉन सहेली, अॅमेझॉन कारिगरसह भारतातील आणि जगातील टॉप ब्रँन्डचे प्रोडक्ट्स सुद्धा यामध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.(Upcoming Mobiles: पोको इंडिया नवीन C31 मोबाईल 30 सप्टेंबरला करणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत)

Tweet:

या सेलमध्ये नागरिकांना 1 हजारांहून अधिक टॉप ब्रँन्ड्स जसे सॅमसंग, वनप्लस, शाओमी, सोनी, अॅप्पल, बोट, लिनोवो, एचपी, असुस, फॉसिल, लिवाइस, बिबा, अॅलन सोली, आदिदास यांचा समावेश असणार आहे. अॅमेझॉनच्या बिझनेस कस्टमर्सला मोठ्या प्रमाणात खरेदी, कॅशबॅक, रिवॉर्ड सारख्या सुविधांचा फायदा घेता येणार आहे.