PM नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना Aarogya Setu App डाऊनलोड करण्याचे केले आवाहन; जाणून घ्या या अ‍ॅपच्या मदतीने कोरोना संशयित रूग्ण ओळखण्यास कशी होते मदत?
Aarogya Setu App (Photo Credits: Government of India)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 एप्रिल) भारतीयांना संबोधित करताना लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. दरम्यान वेळेस त्यांनी देशवासियांना 'Aarogya Setu App'डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं आहे. 'आरोग्य सेतू अ‍ॅप' च्या माध्यमातून कोरोनाबाधित आणि संशयितांचा ठावठिकाणा शोधणं, नागरिकांना वेळीच सतर्क करून कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस युजर्सना अशा दोन्ही स्मार्टफोन युजर्सना हे अ‍ॅप मोबाईल मध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. दरम्यान नागरिकांची प्रार्थमिक माहिती घेऊन त्यांना वेळोवेळी अलर्ट करण्याचं काम या अ‍ॅपच्या माध्यमातून होणार आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉन्च करण्यात आलेलं आरोग्य सेतू अ‍ॅप 11 विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे इंग्रजीचं ज्ञान नसणार्‍याही अनेक भारतीयांना आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून सतर्क राहण्यास मदत होणार आहे.Coronavirus संकट काळात भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Ministry of AYUSH ने सुचवले हे नैसर्गिक उपाय!

आरोग्य सेतू अ‍ॅप कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यास कशी करणार मदत?

  • गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर वरून आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर अ‍ॅप तुम्हांला सर्दी, खोकला, ताप अशा समस्या आहेत का? याची विचारणा करेल.
  • तुम्हांला कोरोनाची प्रमुख लक्षणं नसतील तर तुम्ही ग्रीन झोनमध्ये असाल.
  • हे अ‍ॅप युजर्सना मोबाईल फोनचं ब्लुटुथ आणि लोकेशन डिव्हाईस ऑन ठेवण्याचं आवाहन करते.
  • जेव्हा युजर मोबाईल घेऊन घराबाहेर पडतो तेव्हा आजुबाजूच्या ब्लुटुथच्या माध्यमातून संदेश पाठवला जातो.
  • जर युजर कोरोना लक्षणं नसणार्‍या एखाद्या व्यक्तीच्या आसपास असेल तर तो ग्रीन झोन दाखवणार.
  • मात्र ती व्यक्ती भविष्यात (10 दिवसांच्या आत) कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास तुम्हांला तात्काळ अलर्ट पाठवला जाईल.
  • अशा परिस्थितीमध्ये युजर्स स्वतःहून कोरोनाची चाचणी करून त्यांनाही संसर्ग झाला आहे का? हे तपासून घेऊ शकतात.
  • आरोग्य सेतू अ‍ॅप युजर्सना कोरोना हॉट्स्पॉट्सचीदेखील माहिती देतात. त्यानुसार तुम्ही बाहेर पडल्यास आपला रस्ता बदलू शकतात.

भारतीयांच्या सुरक्षेसाठी Ministry of Human Resource Development ने Digital Indiaच्या सोबतीने आरोग्य सेतू अ‍ॅप लॉन्च केले आहे. सध्या देशभरात एक कोटीपेक्षा अधिक भारतीयांनी अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. विविध भारतीय भाषांसोबतच भारताच्या विविध भागांमध्ये वापरता येऊ शकतं अशाप्रकारे डिझाईनदेखील केलं आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या पार गेली आहे. अद्याप या जीवघेण्या आजारावर कोणतेही ठोस औषध नसल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळूनच या आजाराची साखळी तोडण्यास मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.