Coronavirus संकट काळात भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Ministry of AYUSH ने सुचवले हे नैसर्गिक उपाय!
Immunity | Photo Credits: Pixabay.com

कोरोना वायरसचं संकट भारतामध्ये रोखण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन आता 19 दिवसांनी अधिक वाढवला आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत भारतात कोरोना व्हायरस विरूद्धचा मुकाबला लढण्यासाठी भारतीयांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज सकाळी भारताला उद्देशून लॉकडाऊन वाढवण्याच्या भाषणामध्ये नरेद्र मोदींना देशवासीयांना 7 सूत्रांचं पालन करण्याचेही आवाहन केले आहे. या सुत्रांपैकी एक असलेल्या भारतीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं. Ministry of AYUSH या केंद्रीय मंत्रालय विभागाकडून भारतीयांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खास उपाययोजना आणि घरगुती उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीयांना आयुर्वेदाची देणगी मिळाली आहे. या औषधपद्धतीमध्ये सुचवण्यात आलेल्या काही उपायांचा घरच्या घरी वापर केल्यास आपल्याला शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळू शकते. मग पहा ऋतूमानात झालेल्या बदलांमुळे कोरडा खोकला ते घशातील खवखव अशा लहानसहान समस्यांपासून ते आजारांना रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल?

काही दिवसांपूर्वी Ministry of AYUSH ने त्यांच्या ट्वीटर हॅन्डलवरून नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय केले जाऊ शकते? याची माहिती दिली होती. तसेच भारतीयांना आरोग्य सेतू अ‍ॅपदेखील डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Coronavirus Outbreak: मास्कचा वापर कसा, केव्हा, कुठे करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोरडा खोकला, घशातील खवखव कमी करण्यासाठी

दिवसातून एकदा उकळत्या पाण्यात पुदीन्याची पानं किंवा ओव्याचे दाणे/ पानं टाकून वाफ घ्या.

घसा खवखवत असल्यास लवंगाची पूड आणि मधाचं मिश्रण करून चघळा.

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी

रोग सकाळी एक टीस्पून च्यवनप्राश खाऊन दिवसाची सुरूवात करा. मधुमेहींनी शुगर फ्री च्यवनप्राशचा पर्याय निवडावा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस, लवंग, दालचिनी, मिरी, ओवा, मनुका यांचा काढा बनवून तो दिवसातून दोनदा प्यावा.

दिवसातून दोनदा गरम दूध आणि हळदीचं मिश्रण प्यायल्याने देखील फायदा होऊ शकतो.

नियमित गरम पाणी पिण्याची सवय ठेवा.

दिवसभरात किमान 30 मिनिटं प्राणायम आणि योगसाधना करावी.

आहारात लसूण, ओवा, जिरं, आलं असे मसाल्याचे पदार्थ आवर्जुन वापरा.

Ministry of AYUSH चं ट्वीट 

Ministry of AYUSH कडून सुचवण्यात आलेले हे उपाय केवळ सामान्यपणे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे उपाय आहेत. सर्दी, खोकला अशा आजाराची तीव्रता वाढत गेल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वेळीच डॉक्टरांचा घेणं आवश्यक आहे. तसेच हे उपाय कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या कोव्हिड 19 आजारावरील उपाय नाहीत त्यामुळे तुम्हांला त्रास जाणवत असल्यास तात्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी करून मनातील शंका दूर करणं गरजेचे आहे. तसेच या काळात सकारात्मक विचार करा, ताण तणावापासून दूर रहा. ताण तणावामुळेही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत पडू शकते.