Petrol-Diesel भरल्यानंतर मिळणार 150 रुपयांचा कॅशबॅक, 'या' पद्धतीने घ्या लाभ
PhonePe (Photo Credits-Twitter)

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. अशातच आता जर तुम्ही तुमच्या वाहनात पेट्रोल किंवा डिझेल टाकण्यासाठी जाणार असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्यासाठी ठरणार आहे. कारण आता पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाल कॅशबॅकची सुविधा मिळणार आहे. तर PhonePe आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल भरल्यानंतर कॅशबॅक मिळणार आहे. इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत गॅस आपल्या ग्राहकांसाठी एक खास घेऊन आला आहे. तर जाणून घ्या तुम्हाला किती रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे.

यामध्ये तुम्हाला 0.75 लाखांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. ग्राहकाला एका ट्रांजेक्शनवर कमीतकमी 45 रुपये मिळणार आहेत. तर एका महिन्यात अधिकाधिक 150 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत घेता येणार आहे.(Sovereign Gold Bond Scheme: 2021-22 वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमची पहिली विक्री आजपासून; जाणून घ्या दर काय?)

जर तुम्ही Indian Oil किंवा Hindustan Petroleum किंवा भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या PhonePe चा QR कोड स्कॅन करुन पेमेंट करता येणार आहे. जेथे स्कॅन करण्याची सुविधा नाही तेथे पेट्रोल पंपाकडून तुमच्या अॅपवर निर्धारित रक्कम रिक्वेस्ट येणार आहे. ती Approve करुन पेमेंट करता येणार आहे.(NEFT सुविधा येत्या 23 तारखेला रात्री 12 त दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार, सिस्टिम अपडेच्या कारणामुळे घेतला निर्णय)

ग्राहकांना आपल्या बँकेच्या खात्यात कॅशबॅक फोनपे गिफ्ट वाउचर बॅलेंस रुपात मिळणार आहे. तर 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. याचा वापर तुम्ही रिचार्ज किंवा एखादे बिल भरण्यासाठी करु शकतात. खासियत अशी की, तुम्हाला फोनपे वॉलेटमध्ये जमा झालेले पैसे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या अॅपवरील लिंक असलेल्या युपीआय अकाउंट मधून पेमेंट करता येणार आहे.