Sovereign Gold Bond Scheme: 2021-22 वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमची पहिली विक्री आजपासून; जाणून घ्या दर काय?
Gold Rate (photo Credits: PTI)

तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आजपासून सुरू होणार्‍या सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond Scheme) च्या नव्या सिरीजच्या माध्यमातून तुम्हांला एक खास संधी मिळाली आहे. आजपासून केंद्र सरकार 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond Scheme)ची पहिली विक्री सुरू करत आहे. ही पुढील 5 दिवस चालणार आहे. हे गोल्ड बॉन्ड्स भारत सरकार कडून आरबीआय जारी करते. भारतामध्ये आता फिजिकल गोल्डची वाढती मागणी पाहता सरकारने गोल्ड बॉन्ड्स जाहीर केले आहेत. दर महिन्यात विशिष्ट दरामध्ये आणि ठराविक काळासाठी हे गोल्ड बॉन्ड्स उपलब्ध करून देले जातात. गुंतवणूक म्हणून तुम्ही सोन्याकडे पाहत असाल तर हाा एक चांगला पर्याय आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम आजपासून सुरू होणार

केंद्र सरकार मे 2021 पासून सप्टेंबर 2021 दरम्यान Sovereign Gold Bond Scheme 2021-22 च्या अंतर्गत गोल्ड बॉन्ड्स 6 टप्प्यांमध्ये जारी करणार आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. आजपासून खुल्या झालेल्या या गोल्ड बॉन्ड्स मध्ये इश्यू प्राईज 4777 रूपये प्रति ग्राम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एक तोळ्यासाठी 47,770 रूपये मोजावे लागणार आहेत. ऑनलाईन स्वरूपात तुम्ही यासाठी व्यवहार केल्यास प्रतिग्राम 50 रूपये डिस्काऊंट दिले जाणार आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स चा मॅच्युरिटीचा काळ हा 8 वर्ष असतो. 17 ते 21 मे दरम्यान पहली सीरीज खरेदी केली जाऊ शकते. त्यासाठी बॉन्ड्स 25 मे ला दिले जातील. नंतर 24 मे ते 28 मे दुसरा टप्पा सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल. त्याचे बॉन्ड 1 जूनला दिले जातील. 31 मे ते 4 जून दरम्यान तिसरी सीरीज, 12जुलै ते 16 जुलै दरम्यान चौथी सीरीज, 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पाचवी सीरीज आणि 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान सहावी सीरीज या वर्षासाठी जारी केली जाणार आहे.