नोकिया कंपनीच्या X सीरिजची युजर्सकडून गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा केली जात होती. अशातच आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार हे स्मार्टफोन 5G सपोर्ट करणारे असणार आहेत. तर कंपनीने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत अखेर Nokia X सीरिज ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या सीरिजअंतर्गत Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोन उतरवण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीचे टॉप मॉडेल असून 5जी कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध होणार आहेत. या व्यतिरिक्त फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून काही शानदार फिचर्स दिले गेले आहेत.(Realme C20, Realme C21 आणि Realme C25 अखेर भारतात लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमतीविषयी)
Nokia X10 तीन स्टोरेज मॉडेलमध्ये उतरवण्यात आला आहे. यामध्ये 6GB+64GB+128GB आणि 4GB+128GB स्टोरेजचा समावेश आहे. फोनची सुरुवाती किंमत EUR 309 म्हणजेच 27,400 रुपये आहे. तर Nokia X20 ची सुरुवाती किंमत EUR 349 म्हणजेच 31,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये 6GB+128GB आणि 8GB+128GB स्टोरेजचा समावेश आहे. याचा सेल जून मध्ये सुरु होणार आहे.
Nokia X10 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला गेला आहे. जो पंच होल डिझाइनसह येणार आहे. हा Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर लैस आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये 48MP चा मुख्य सेंसर, 5MP चा अल्ट्रा वाइड अँगल, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP चा मॅक्रो शूटर दिला गेला आहे. तर फोनचा फ्रंट कॅमेरा 8MP चा असणार आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 4700mAh ची बॅटरी दिली गेली आहे.(नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतायत? 'हे' आहेत 15 हजारांपर्यंतचे फोन)
तर Nokia X20 मध्ये 6067 इंचाच फुल एचडी+ डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनचा प्रायमरी सेंसर 64 चा आहे. तर यामध्ये 5MP चा अल्ट्रा वाइड अँगल, 2MP चा अल्ट्रा वाइड अँगल, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP चा मॅक्रो शूटर दिला गेला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये 32 MP चा फ्रंट कॅमेरा युजर्सला मिळणार आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480 वर काम करणार आहे. यामध्ये 4470mAh ची बॅटरी दिली गेली आहे.