Realme C20, Realme C21 and Realme C25 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme आपले C सीरिजचे नवे स्मार्टफोन्स आज भारतात लाँच केले आहेत. यात Realme C20, Realme C21 आणि Realme C25 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोन्समध्ये किंमतीच्या तुलनेत आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हे स्मार्टफोन्स बाजारातील अन्य ब्रँडच्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देतील. हे तिनही स्मार्टफोन्स एंट्री लेवल सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. यातील Realme C20 स्मार्टफोन 13 एप्रिल, Realme C21 स्मार्टफोन 14 एप्रिल आणि Realme C25 स्मार्टफोन 16 एप्रिलला विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme C20 स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, हा 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह भारतात लाँच केला आहे. याची किंमत 6,999 रुपये इतकी आहे. यात 6.5 इंचाची डिस्प्लेसह मिडियाटेक हेलिओ जी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा Android 10 वर आधारित realme UI वर काम करतो.हेदेखील वाचा- Whatsapp कडून Vaccines for All Stickers चे अनावरण; कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल

Realme C21 बद्दल सांगायचे झाले तर, यात 3GB+32GB स्टोरेज आणि 4GB+64GB स्टोरेज अशा दोन वेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे 7999 रुपये आणि 8999 रुपये इतकी आहे. यात 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले दिली आहे. हा मिडियाटेक हेलिओ जी35 प्रोसेसरसह येतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

Realme C25 बद्दल सांगायचे झाले तर, यात 4GB+64GB आणि 4GB+128GB असे दोन वेरियंट लाँच केले आहेत. याची किंमत अनुक्रमे 9999 रुपये आणि 10,999 रुपये अशी आहे. यात 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले दिली आहे. त्याचबरोबर यात मिडियाटेक हेलिओ जी70 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा आहे. यात 6000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा आहे.