Representational Image (Photo Credit: File Photo)

ग्राहकांमध्ये सध्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल डिमांड अधिक वाढत चालली आहे. तर फ्रंट कॅमेऱ्यातून सेल्फी काढण्यासाठी उत्तम कॅमेरा पाहिजे म्हणून किमी किंमतीत चांगला फोन घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये 64MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जातो. याच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह वाइड अँगल लेन्स, डेप्थ सेंसर आणि मॅक्रो लेन्स मिळणार आहे. त्याचसोबत पॉवरबॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाते. तर जाणून घ्या 15 हजारापर्यंचे कोणते दमदार स्मार्टफोन तुम्ही खरेदी करु शकता त्याबद्दल अधिक माहिती.(Realme X7 Pro एक्सट्रीम स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला 64MP कॅमेऱ्यासह 4500mAh ची मिळणार बॅटरी)

मोटोरोला कंपनीचा Moto G30 स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे. या फोनमध्ये 1600X720 पिक्सलची स्क्रिन रेज्यॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला गेला आहे. अॅन्ड्रॉइड 11Os वर आधारित स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसरवर उतरवण्यात आला आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमोरी दिली गेली आहे. जी मायक्रोएसडीच्या मदतीने वाढवता येणार आहे. Moto G30 मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 20W टर्बो पॉवर चार्जिंग सपोर्ट्सह येणार आहे. फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले गेले आहेत. याचा प्रायमरी सेंसर 64MP चा आहे. तर यामध्ये 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर दिला गेला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 13MP चा असून त्याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी काढता येणार आहे.

POCO X3 हा स्मार्टफोन तुम्हाला 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. यामध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास5 चे प्रोटेक्शन मिळणार आहे. फोनचा डिस्प्ले 2340X1080 पिक्सल आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करणार आहे. जो गेमिंगसाठी अत्यंत शानदार ठरणार आहे. पोको एक्स3 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरसह येणार आहे. कंपनीच्या मते हा जगातील असा पहिला स्मार्टफोन आहे जो Snapdragon 732G प्रोसेसरसह येणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. याचा प्रायमरी सेंसर 64MP चा Sony IMX682 असणार आहे. या व्यतिरिक्त 13MP चा 119 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP ची टेलिमायक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर मिळणार आहे. तर फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP इन स्क्रिन कॅमेरा दिला गेला आहे.(Sony लॉन्च करणार नवा Xperia स्मार्टफोन, येत्या 14 एप्रिलला आयोजित करणार कार्यक्रम)

Realme7 स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. याचा स्मार्टफोन लेटेस्ट ऑक्टा कोर MediaTek Helio G95 प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. तर हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10वर आधारित Realme UI वर काम करणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा दिला गेला आहे. ज्यामध्ये 64MP चा सोनी IMX682 सेंसर, 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. कंपनीने Realme 7 स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, ब्लुटूश, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर्स दिले गेले आहेत. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 30W Dart Charge सपोर्ट करणार आहे.