Nokia 4.2 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च, जाणून घ्या दमदार फीचर्स
Nokia 4.2 (Photo Credits-Twitter)

एचएमडी ग्लोबलने भारतात Nokia 4.2 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,990 रुपये असून त्यामध्ये 3GB RAM आणि 32GB स्टोरेज वेरिंयटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

नोकिच्या अधिकृत वेबसाईटवरुन ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. तर रिटेल स्टोरमध्ये नोकिया 4.2 स्मार्टफोन 14 मे पासून खरेदी करता येणार आहे. ऑफर्समध्ये या स्मार्टफोनसाठी 500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही ऑफर्स 10 जून पर्यंत लागू असणार आहे.(OnePlus 7Pro वनप्लस 7प्रो मध्ये असणार ‘HDR 10 Plus’ डिस्प्ले)

यामध्ये 5.71 इंचाचा HD Display देण्यात आला असून वॉटर ड्रॉप स्टाईल नॉचसुद्धा देण्यात आले आहे. नोकीया 4.2 मध्ये Qualcomm Snapdragon 439 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डुअर रियर कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास 3,000mAh देण्यात आली आहे.