OnePlus 7Pro वनप्लस 7प्रो मध्ये असणार ‘HDR 10 Plus’ डिस्प्ले
OnePlus 7 Pro To Get Triple Rear Camera (File Photo)

OnePlus 7 Pro स्मार्टफोनच्या जगात ग्राहकांमध्ये आपली विशेष अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली वनप्लस कंपनी आपला एक नवीन आकर्षक असा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. वनप्लस 7प्रो असे ह्या स्मार्टफोनचे नाव असून ह्यात HDR 10 Plus प्रमाणित डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या डिस्प्लेमुळे ग्राहकांना खूप उत्कृष्ट असा अनुभव मिळणार असल्याचे ह्या कंपनीचे सीईओ पेटे लाऊ यांनी स्पष्ट केले आहे.

वनप्लस चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पेटे लाऊ यांनी सांगितले की, “HDR 10 Plus हा केवळ टीव्ही नव्हे तर स्मार्टफोन डिस्प्लेचेही भविष्य आहे. आमचा हा स्मार्टफोन स्मार्टफोन जगतात एक नवीन बेंचमार्क स्थापन करेल आणि ग्राहकांमध्ये एक पारदर्शकता निर्माण करेल. वनप्लस 7 प्रो च्या स्क्रीनमध्ये डिस्प्लेद्वारा देण्यात आलेली ‘एप्लस टॉपग्रेड’ रेटिंग सुद्धा आहे तर वीडीई ने ह्याला ‘सेफ्टी फॉर आईज’(डोळ्यांची सुरक्षेसाठी) ने प्रमाणित करण्यात आले आहे.” वनप्लस कंपनी भारतात वनप्लस 7प्रो तीन प्रकारांत लाँच करेल. ज्यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी असेल, ज्याची किंमत 49,999 इतकी असेल.

ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह लॉन्च होणार OnePlus 7 Pro; पहा काय आहे या स्मार्टफोनची खासियत

‘विनफ्यूचर’ च्या रिपोर्टनुसार, ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आले असून, 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लस कंपनी 14 मे ला बंगळूरुमध्ये एका कार्यक्रमाद्वारे वनप्लस 7 सह ह्या स्मार्टफोनला जागतिक स्तरावर लाँच करेल. तूर्तास कंपनीने वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनची ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’(Amazon India) वर प्री बुकिंग सुरु केली आहे.