ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह लॉन्च होणार OnePlus 7 Pro; पहा काय आहे या स्मार्टफोनची खासियत
OnePlus 7 Pro To Get Triple Rear Camera (File Photo)

चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) आपला नवा स्मार्टफोन लवकरच सादर करणार आहे. 14 मे रोजी हा फोन सादर करण्यात येणार असून कंपनी एकाच वेळेस दोन फोन लॉन्च करणार आहे. वन प्लस 7 आणि वन प्लस 7 प्रो. त्यापूर्वी कंपनीने फ्लॅगशिप OnePlus 7 Pro च्या ट्रिपल कॅमेराचा टीझर ट्विटरवर शेअर केले आहे. OnePlus 7 Pro चे फिचर्स आणि मागे देण्यात आलेला ट्रिपल कॅमेरा दर्शवणारा एक व्हिडिओ कंपनीने पोस्ट केला आहे.

व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 7 Pro मध्ये रिअर व्हर्टिकल शेप ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा मागे टॉर सेंटरमध्ये देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल, व्हाईड अँगल कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि टेलिफोटो कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल. वनप्लस 7 प्रो स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात येईल.

पहा व्हिडिओ:

रिपोर्टनुसार, वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपयांहून अधिक असेल. हा स्मार्टफोन आलमंड, मिरर ग्रे आणि नेबुला ब्लू रंगात उपलब्ध होईल.

OnePlus ट्विट:

वनप्लस 7 सीरीज अंतर्गत कंपनीतर्फे अनेक स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात येतील. कंपनी आपला पहिला 5G स्मार्टफन देखील सादर करु शकते. मात्र याची स्पष्टता कंपनीकडून देण्यात आलेली नाही.